Sangli: आटपाडीत विनयभंगप्रकरणी शिक्षक बँकेच्या माजी अध्यक्षावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:25 IST2025-04-21T15:24:51+5:302025-04-21T15:25:13+5:30

आटपाडी : कोरोना काळात दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षक व जिल्हा शिक्षक बँकेचा माजी ...

Former chairman of Teachers Bank arrested in molestation case in Atpadi sangli | Sangli: आटपाडीत विनयभंगप्रकरणी शिक्षक बँकेच्या माजी अध्यक्षावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय..वाचा

Sangli: आटपाडीत विनयभंगप्रकरणी शिक्षक बँकेच्या माजी अध्यक्षावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय..वाचा

आटपाडी : कोरोना काळात दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षक व जिल्हा शिक्षक बँकेचा माजी अध्यक्ष पोपट सुखदेव सूर्यवंशी (मूळ रा. खांजोडवाडी, सध्या रा. आटपाडी) यास आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना १९ एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता आटपाडी तालुक्यातील कुचरेवाडी पळसखेल येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेने पोपट सूर्यवंशी यांना कोरोना काळात काही पैसे दिले होते. हे पैसे परत मागण्यासाठी पीडित महिला भावाला घेऊन सूर्यवंशीच्या शेतातील घरी गेली होती. यावेळी सूर्यवंशी यांनी पैसे देण्यास नकार दिला. पीडितेला शिवीगाळ करत त्याने तिचा विनयभंग केला. 

‘मी अनेकांना जेलमध्ये बसवले आहे आणि तुम्हालाही कामाला लावतो. तुम्ही परत पैसे मागितले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी त्याने दिल्याची तक्रार पीडितेने दिली. पोलिसांनी पोपट सूर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Former chairman of Teachers Bank arrested in molestation case in Atpadi sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.