शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

राज्यभरात पाच कोटीच्या बनावट नोटा चलनात, टोळीची कबूली, नवी मुंबईतून दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 1:58 PM

बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करताना सापडलेल्या टोळीने गेल्या दीड वर्षात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपये राज्यभरात चलनात आणल्याची धक्कादायक माहिती सांगली शहर पोलिसांच्या चौकशीतून शनिवारी पुढे आली.

ठळक मुद्देराज्यभरात पाच कोटीच्या बनावट नोटा चलनात, टोळीची कबूली नवी मुंबईतून दोघांना अटक; दोन हजाराच्या आणखी ९२ नोटा जप्त

सांगली : शहरात बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करताना सापडलेल्या टोळीने गेल्या दीड वर्षात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपये राज्यभरात चलनात आणल्याची धक्कादायक माहिती सांगली शहर पोलिसांच्या चौकशीतून शनिवारी पुढे आली.

याप्रकरणी नवी मुंबईतून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही दोन हजाराच्या ९२ नोटा जप्त केल्या आहेत. अटकेतील संशयितांची संख्या आता पाच झाली आहे. तसेच ११३ बनावट नोटा जप्त केल्या आहेत.सूरज उर्फ मनिष मल्ला ठाकुरी (वय ३६, रा. अर्जुनवाडी, घनसोली, नवी मुंबई) व जिलानी आश्पाक शेख (४७, शिव कॉलनी, गजानन मंदिरजवळ, एरोल सेक्ट १, नवी मुंबई) अशी नव्याने अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

यापूर्वी राज राजकुमार उज्जेनवाल सिंह (२८) प्रेमविष्णू रोगा राफा (२६), नरेंद्र आशापाल ठाकूर (३३, कल्याण) या तिघांना अटक केली होती. हे तिघे व नव्यान अटक केलेला मनिष ठाकुरी २३ आॅगस्ट रोजी सांगलीत आले होते. मुख्य बसस्थानकाजवळील एका दुकानातून त्यांनी खाद्यपदार्थ खरेदी केले.

यासाठी त्यांनी दोन हजाराची नोट दिली. दुकानात महिला होती. तिला या नोटेविषयी शंका आल्याने तिने संशयितांना, नोट बनावट आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता. त्यादिवशी राज सिंह यास पकडले होते. त्याचे साथीदार पळून गेले होते. त्यांना गेल्या आठवड्यात पकडले होते.अटकेतील राज सिंह, प्रेमविष्णू राफा व नरेंद्र ठाकूर या तिघांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीतून जिलानी शेख व सूरज ठाकूरी यांची नावे निष्पन्न झाली. त्यांच्या शोधासाठी शहर पोलिसांचे पथक शुक्रवारी सकाळी नवी मुंबईला रवाना झाले होते.

तेथून पथकाने या दोघांना पकडले. दोघांच्या घराची झडती घेतल्यानंतर दोन हजाराच्या आणखी ९२ बनावट नोटा सापडल्या. त्या जप्त करुन पथक शनिवारी पहाटे सांगलीत दाखल झाले. यातील जिलानी शेख हा टोळीचा म्होरक्या आहेत. त्याच्या चौकशीतूून बनावट नोटांचे मुख्य केंद्र पश्चिम बंगाल असल्याचे स्पष्ट झाले आहेत. तेथील दोघांची नावे पुढे आली आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिसांचे पथक येत्या एक-दोन दिवसात पश्चिम बंगालला रवाना होणार आहे.दहा हजाराला...एक लाख रुपये!जिलानी शेख याचे पश्चिम बंगालमधील मालदा हे गाव आहे. नवी मुंबईत त्याचे चिकन विक्रीचे दुकान आहे. पश्चिम बंगालला तो अधून-मधून जातो. तिथे तो बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने हा व्यवसाय सुरु केला.

बंगालच्या या टोळीचे बँकेत खाते आहे. या खात्यावर दहा हजार रुपये भरल्यानंतर ही टोळी त्या बदल्यात दोन हजाराच्या बनावट ५० नोटा (एक लाख रुपये) देते. या नोटा घेऊन एकजण रेल्वेने कल्याणमध्ये येतो. त्याच्याकडून शेख नोटा घेऊन त्या साथीदारांच्या माध्यमातून चलनात आणत होता. टोळीच्या खात्यावर आतापर्यंत त्याने १२ लाख रुपये भरले आहेत. यावरुन त्यान या बदल्यात एक कोटी २० लाख रुपये (बनावट नोटा) घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.बनावट कागदपत्रे जप्तअटकेतील संशयितांचे पाचही मोबाईल जप्त केले आहेत. याशिवाय प्रेमविष्णू राफा याची स्वत:च्या नावावरील तीन बनावट आधार कार्ड, तीन बनावट पॅनकार्ड, विविध बँकाची पाच एकटी जप्त केले आहेत. या सर्वांचे कोणत्या-कोणत्या बँकेत खाते आहे, याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. बँक व्यवहारावरुन पश्चिम बंगालच्या टोळीतील काही जणांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.नाशिकमध्ये गुन्हाबनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी जिलानी शेख याच्याविरुद्ध नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला दोन वर्षापूर्वी अटकही झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा बनावट नोटांचा हा व्यवसाय सुरु केला. आता तो सांगली पोलिसांच्या हाती लागला आहे.तीनशे रुपये कमिशनजिलानी शेख याच्याकडे प्रेमविष्णू राफा हा प्रथम कामाला होता. दोन हजाराची एक नोटा बाजारात चलनात आणली की शेख त्याला तीन रुपये कमिशन देत असे. चलनात सहजपणे नोट खपू लागल्याने राफाने जिलानीकडून टोळीचा पत्ता घेऊन स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. दोघांनीही नोटा खपविण्यासाठी कमिशनवर एजंटांची नियुक्त केली. हे एजंटही त्याने परिस्थितीने गरीब असलेले निवडले.टोळीची राज्यफर सफरगेल्या दीन वर्षात टोळीने राज्यातील सर्व जिल्ह्यात सफर करुन सुमारे पाच कोटी रुपयांची रक्कम चलनात आणल्या आहेत. या सर्व दोन हजाराच्या बनावट नोटा आहेत. इंटरनेटवरुन ते प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेत असे. त्यानंतर ते प्रवासाला निघत असे. सांगलीचीही त्यांनी इंटरनेटवरुन माहिती घेतली. त्यानंतर राफासह चौघे रेल्वेने मिरजेत आले. तेथून ते सांगलीत आले होते.पथकाचे कौतूकजिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कैलास कोडग, उपनिरीक्षक गणेश शिंदे, हवालदार दिनकर चव्हाण, रमेश जाधव, बिरोबा नरळे, सुशांत ठोंबळे व सायबर पोलीस ठाण्याचे अमोल क्षिरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस प्रमुख शर्मा यांनी पथकाचे कौतूक केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीNavi Mumbaiनवी मुंबई