A fire broke out in an agricultural medicine warehouse in the market yard | मार्केट यार्डातील शेती औषध गोदामास आग

मार्केट यार्डातील शेती औषध गोदामास आग

ठळक मुद्देमार्केट यार्डातील शेती औषध गोदामास आग लाखोचे नुकसान: शॉर्टसर्किटमुळे आग लागली

 संजय नगर /सांगली :  शहरातील वसंतदादा पाटील मार्केट यार्ड येथील औषध गोदामास बुधवारी सकाळी आग लागली. तात्काळ या आगीने रौद्ररूप धारण केले. अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. एक तासाच्या प्रयत्ननंतर ही आग आटोक्यात आली आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

येथील मार्केट यार्डतील वसंतदादा बँकेजवळ हे गोदाम आहे. त्याठिकाणी शेतीला लागणारी औषधांचा साठा करून ठेवण्यात आला आहे. गोदामास बुधवारी सकाळी आग लागली. तात्काळ या आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाच्या तीन बंबच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: A fire broke out in an agricultural medicine warehouse in the market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.