सांगलीतील मालिका आणि चित्रपटांची चित्रिकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 17:19 IST2021-05-27T17:17:41+5:302021-05-27T17:19:27+5:30

CoronaVirus cinema Sangli : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंध अधिक कडक केल्याने जिल्ह्यातील चित्रिकरणे गोवा आणि गुजरातला स्थलांतरीत झाली आहेत. चित्रिकरणामुळे निर्माण होणारा रोजगार यामुळे थांबला आहे.

Filming of Sangli series and films migrated to Goa, Gujarat | सांगलीतील मालिका आणि चित्रपटांची चित्रिकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरीत

सांगलीतील मालिका आणि चित्रपटांची चित्रिकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरीत

ठळक मुद्देसांगलीतील मालिका आणि चित्रपटांची चित्रिकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरीतसांगली चित्रिकरणासाठी आवडती डेस्टीनेशन्स

संतोष भिसे 

सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंध अधिक कडक केल्याने जिल्ह्यातील चित्रिकरणे गोवा आणि गुजरातला स्थलांतरीत झाली आहेत. चित्रिकरणामुळे निर्माण होणारा रोजगार यामुळे थांबला आहे.

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात मालिका आणि चित्रपटांची चित्रिकरणे मोठ्या प्रमाणात सुरु झाली होती. विशेषत: मराठी वाहिन्यांवरील मालिका व लो बजेट चित्रपटांची चित्रिकरणे सातत्याने कोठे ना कोठे सुरु असायची.कोरोनाच्या पहिल्या लाटेत निर्बंधांचे पालन करत छायाचित्रण सुरु राहिले होते. दुसऱ्या लाटेत निर्बंध कडक झाल्यानंतर निर्मात्यांनी गाशा गुंडाळला. गोवा, सिल्वासा, दीव, दमण आदी ठिकाणी स्थलांतर केले. तेथे निर्बंध शिथील असल्याने तसेच निसर्गसौंदर्याची स्थळे भरपूर असल्याने चित्रिकरण सोयीचे ठरले.

सांगलीत चित्रिकरणे थांबल्याने त्यातील रोजगारही थांबला. हॉटेल्स व लॉजमधील कलाकारांचे मुक्काम थांबले. सांगली-मिरजेत केटरिंग व्यावसायिकांकडून कलाकारांना जेवण पुरवले जायचे. त्याशिवाय कलाकारांची ने-आण करणारी वाहतूक, मालिकेत सहकलाकार म्हणून मानधनावर मिळणारी संधी, चित्रिकरणासाठी इमारत मालकांना मिळणारे भाडे अशी मोठी उलाढाल व्हायची. हे सारे अर्थचक्र आता थंडावले आहे.

चित्रिकरणासाठी आवडती डेस्टीनेशन्स

कृष्णा आणि वारणा नद्यांचा परिसर, विविध गावांतील ऐतिहासिक वाडे, देखणे फार्म हाऊस, दंडोबाच्या डोंगररांगा, वाळवा तालुक्यात लांबच लांब पसरलेली फुलशेती ही काही डेस्टीनेशन्स निर्मात्यांना आकर्षित करायची. मिरजेतील कृष्णाघाटावर मालिका व गाण्यांच्या अल्बमची छायाचित्रणे अखंडपणे व्हायची. मिरजेचे भूतपूर्व संस्थानिक पटवर्धन सरकारांच्या बेडग रस्त्यावरील देवी भवनमध्ये तर सुमारे वर्षभरापासून अखंडपणे एका मराठी मालिकेचे छायाचित्रण सुरु होते. वाळवा तालुक्यातील रामलिंग बहे, अ‍ौदूंबर येथील दत्त देवस्थान, अंकली गावातील ऐतिहासिक वाडे, कवठेएकंद येथील सिद्धनाथ मंदिर, सांगलीत मिशन कंपाऊंड, आयर्विन पूल, मालगावचा बावाफन दर्गा ही काही चित्रिकरण स्थळे निर्मात्यांच्या आवडीची ठरली होती.
 

Web Title: Filming of Sangli series and films migrated to Goa, Gujarat