शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

पन्नास वर्षांत बारावेळा आला मान्सून उशिरा - : नऊवेळा जून कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:14 PM

मागील पन्नास वर्षांत जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस तब्बल बारावेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आला आहे. विशेष म्हणजे या पाच दशकांत नऊवेळा जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले.

ठळक मुद्देपुनर्वसूचा ‘बेडूक’च पेरणीला तारण्याची शक्यता; जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त

अशोक डोंबाळे ।सांगली : मागील पन्नास वर्षांत जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस तब्बल बारावेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आला आहे. विशेष म्हणजे या पाच दशकांत नऊवेळा जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले. यंदा जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरीही पावसाचे आगमन झाले नसल्यामुळे, त्याला उशीरच होण्याची शक्यता आहे. पुनर्वसूच्या बेडूक नक्षत्रावरच शेतकऱ्यांची भिस्त आहे.

सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात दहा वर्षांपूर्वी साधारणपणे ७ ते १५ जूनच्यादरम्यान मान्सूनची सुरुवात होत असे. वटपौर्णिमेला कृष्णा व वारणा नदीला पूर येत होता. ओढे-नालेही भरलेले असायचे. ८ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यावर लगेच शेतकºयांची पेरणीची लगबग सुरू होत असे. साधारणपणे २५ जूननंतर पेरण्या होत होत्या. परंतु, मागील दहा वर्षांचा आढावा घेता मान्सूनचे आगमनच उशिरा होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात पडणाºया पावसाच्या आकडेवारीवरून तर ते स्पष्टच झाले आहे.

मागील ५० वर्षांचा आढावा घेता १९९० मध्ये मान्सून ५ जूनला आला होता, तर २००२ मध्ये २७ जुलैला आलेला मान्सून सर्वात उशिराचा ठरला. तब्बल दहा वर्षे मान्सूनचे आगमन जुलै महिन्यात झाले आहे. ३८ वर्षे मान्सूनचे आगमन ५ ते ३० जूनदरम्यान झाले. यंदा हवामान विभागाने सरासरी पावसाचे भाकित केले आहे. प्रत्यक्षात रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकºयांची पेरणीपूर्व मशागत झालीच नाही. त्यासाठी मृग नक्षत्र उजाडले. मृगाचा पाऊस हलक्या स्वरूपात दोनच दिवस झाला. तोही जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पडला नाही. जिथे पाऊस झाला, तेथे मशागतीची लगबग वाढली आहे. २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होणार असून, त्याचे वाहन हत्ती असल्यामुळे शेतकºयांना चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे. पाऊस चांगला झाला, तरच खरिपाच्या पेरण्या होणार आहेत.

खरीप पेरणीचा उत्तम कालावधी हा १५ जूनपर्यंतच असल्याचे कृषी विभागाचे अधिकारी सांगतात. त्यापुढे म्हणजेच ३० जूनपर्यंत खरीप पेरणी करायची म्हटले तर दोन आठवड्यांचा उशीर होणार आहे. जास्तीत-जास्त शेतकºयांनी १५ जुलैपर्यंतच खरिपाची पेरणी करावी. त्यानंतरचा कालावधी पेरणी आणि त्या पिकासाठी योग्य नसल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.१५ जुलैनंतर पाऊस चांगला झाला, तर शेतकºयांनी खरीपऐवजी अन्य पिकाची पेरणी करावी अथवा रब्बीची वाट पाहणेच उत्तम आहे. मान्सून लांबल्यामुळे निसर्ग भाकितांना दाद देत नाही, हेच वास्तव आहे.जिल्ह्यात खरीप पेरणी केवळ तीन टक्केचजिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण तीन लाख ४८ हजार ५०० हेक्टर लागवड क्षेत्र आहे. यापैकी दि. १८ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ तीन टक्केच पेरणी झाली आहे.यामध्ये सर्वाधिक शिराळा तालुक्यात २७.९ टक्के पेरणी झाली असून त्यातही भाताच्या धूळवाफ पेरणीचा समावेश आहे. उर्वरित एकाही पिकाची पेरणी झाली नाही.पलूस तालुक्यात ०.६ टक्केवाळवा तालुक्यात ०.५ टक्के पेरणी झाली आहे.यामध्ये नदीच्या पाण्यावर काही शेतकºयांनी सोयाबीनची टोकण केली आहे. उर्वरित सात तालुक्यात एक टक्काही पेरणी झाली नसल्यामुळे दुष्काळाची दाहकता स्पष्ट होत आहे. जून संपत आला तरीही पावसाचा जोर नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.दहा वर्षातील जूनमधील पाऊस (मि.मी.)वर्ष पाऊस२००८ ५९.२२००९ ५७२०१० १६४.४२०११ ८६.७२०१२ ४८२०१३ १०४.३२०१४ ६५२०१५ १२९.१२०१६ १११.४२०१७ ८२.१२०१८ १०५.५जिल्ह्यातील १८ जूनपर्यंतचा पाऊस (मिलिमीटर)तालुका जून २०१८ जून २०१९मिरज ५७.५ ८४.६जत २४.४ ६१.७खानापूर १४.६ १०५.२वाळवा ४२.४ ५२.१तासगाव ४६.६ २८.१शिराळा ६२.१ ११०.१आटपाडी ३४ २०.३कवठेमहांकाळ १५.८ ३८.९पलूस ३१.८ ७४.२कडेगाव १८.४ १०६.६सरासरी पाऊस ३६.५ ६८.५

आर्द्रा, पुनर्वसूवरच आता मदार...यंदाच्या पावसाळ्यात ७ जूनपासून सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची मदार आता २२ जूनपासून सुरू होणाºया आर्द्रा नक्षत्रावरच असल्याचे दिसत आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती असल्यामुळे चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. ६ ते १९ जुलै या कालावधित पुनर्वसू नक्षत्र लागणार असून त्याचे वाहन बेडूक असल्यामुळे, पुनर्वसूचा बेडूक पाण्यात डुंबणार का, अशी चर्चा आहे.

मान्सूनपूर्व पावसाने घेतलेली विश्रांती आणि आता मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस