Crime News Sangli: सांगलीत चाकूचा धाक दाखवून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:34 IST2022-06-10T16:32:49+5:302022-06-10T16:34:25+5:30
पीडित महिला व्यायाम करत असताना दुचाकीवरून दोन तरुण तिथे आले. त्यातील एकाने पीडितेला हात लावत मनास लज्जा उप्तन्न होईल असे कृत्य केले. पीडितेने विरोध करताच दुसरा तरुण दुचाकीवरून उतरून आला व त्याने थेट चाकूचा धाक दाखवला.

Crime News Sangli: सांगलीत चाकूचा धाक दाखवून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग
सांगली : शहरातील नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम मैदानावर पहाटे व्यायामासाठी गेलेल्या एका महिला अधिकाऱ्याचा चाकूचा धाक दाखवून विनयभंग करण्यात आला. आज, शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला अधिकारी या दोन वर्षापासून सांगलीत कार्यरत आहेत. त्या विश्रामबाग परिसरात एका बंगल्यामध्ये भाड्याने राहतात. रोज पहाटेच्या सुमारास त्या व्यायामासाठी नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम मैदानावर येतात. शुक्रवारी त्या नेहमीप्रमाणे क्रीडांगणाच्या मध्यभागी येऊन व्यायाम करत होत्या.
दरम्यान, दुचाकीवरून दोन तरुण तिथे आले. त्यातील पाठीमागे बसलेला तरुण तिथे आला व त्याने पीडितेला हात लावत मनास लज्जा उप्तन्न होईल असे कृत्य केले. पीडितेने विरोध करताच दुसरा तरुण दुचाकीवरून उतरून आला व त्याने थेट चाकूचा धाक दाखवला. यानंतर दोघांनी तिथून पलायन केले. या प्रकारानंतर पीडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.