आष्ट्यात पूर्ववैमनस्यातून एकावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:25 AM2021-04-12T04:25:30+5:302021-04-12T04:25:30+5:30

आष्टा : आष्टा येथे पूर्ववैमनस्यातून आठजणांनी शस्त्रांसह प्राणघातक हल्ला केल्याने चाैघे जखमी झाले. यामध्ये लालासाहेब पांडुरंग ढोले हे ...

Fatal attack on one of the eight prejudices | आष्ट्यात पूर्ववैमनस्यातून एकावर जीवघेणा हल्ला

आष्ट्यात पूर्ववैमनस्यातून एकावर जीवघेणा हल्ला

Next

आष्टा : आष्टा येथे पूर्ववैमनस्यातून आठजणांनी शस्त्रांसह प्राणघातक हल्ला केल्याने चाैघे जखमी झाले. यामध्ये लालासाहेब पांडुरंग ढोले हे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार, दि. ९ रोजी रात्री ८ च्या दरम्यान घडली.

या प्रकरणी सूरज प्रकाश सरगर याने आष्टा पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली. यावरून अमर शेळके, बाहुबली ऊर्फ बल्लू शांतीनाथ सरडे, अभी सरवदे, राज माणिक लवटे, भरत शांतीनाथ सरडे, आरिफ सय्यद, श्रेणिक मगदूम, सोन्या आप्पासाहेब शेळके (सर्व रा. आष्टा) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. मारहाणीत एजाज तांबोळी, रोहित वाघमारे व सूरज सरगर हे जखमी झाले आहेत.

येथील सूरज प्रकाश सरगर व अमर शेळके यांच्यात वाद सुरू आहे. पाच दिवसांपूर्वी सूरज दुचाकीवरून दुधगाव रस्त्याने शिंदे हायस्कूल जवळून जात असताना अमर शेळके याने अडवून दमदाटी केली होती. शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान अमर शेळके याने सूरज यास मोबाईलवर फोन करून मारण्याची धमकी दिली. यानंतर सूरज याने त्याचा मामा लालासाहेब ढोले यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ढोले हे एजाज तांबोळी व सूरजसह दुधगाव रस्त्यावरील युवा कट्टा येथे भांडणे मिटविण्यासाठी गेला. याठिकाणी अमर शेळके व त्याच्या सहकाऱ्यांनी चर्चा करण्यापूर्वी तिघांच्या अंगावर धावून आले. त्यामुळे सूरजसह तिघेही रुकडे पेट्रोल पंपासमोरील चायनीज सेंटरजवळ येऊन थांबले.

काही वेळातच अमर शेळके व अन्य सहकारी काठी, लोखंडी गज, तलवारी, लोखंडी पाईप घेऊन आले. त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यात लालासाहेब ढोले यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. ते बेशुद्ध झाले. सूरज सरगर, एजाज तांबोळी व रोहित वाघमारे गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरून जाताना अमर शेळके व मित्रांनी ढोले यांची मोटारसायकल फोडली. लालासाहेब ढोले यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सूरज सरगर याने आष्टा पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक सदामते करीत आहेत.

Web Title: Fatal attack on one of the eight prejudices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.