Sangli: तिसंगीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी राेखली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:19 IST2025-08-19T17:18:04+5:302025-08-19T17:19:33+5:30
शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीतर्फे जोरदार घोषणाबाजी केल्या

Sangli: तिसंगीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी राेखली
घाटनांद्रे : शक्तिपीठ महामार्गाला आम्ही जमीन देणार नाही, अशी लेखी मागणी तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथील शेतकऱ्यांनी दिली होती. तरीही सोमवारी अधिकारी जमीन मोजणीसाठी पुन्हा आले होते. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांना रोखून मोजणी करू नये, विनंती केली.
शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दिगंबर कांबळे म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग हा रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर महामार्ग असून याची कुणीही मागणी केली नाही. असे असताना शेकडो शेतकऱ्यांना भूमिहीन करून हा महामार्ग रेटण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न चालू आहे. शेतकऱ्यांनी मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांना रोखून मोजणी करू नये, अशी विनंती केली. शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीतर्फे जोरदार घोषणाबाजी केल्या.
यावेळी वामन कदम, नागेश कोरे, शिवाजी शिंदे, जगदीश पोळ, किशोर खराडे, सौरभ कदम, किशोर खराडे, दादा कुंभार, संभाजी शिंदे, रत्नाकर वठारे, व इतर बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.