शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

शेतकऱ्यांनो, तुमचा सात-बारा कोरा झाला का? जिल्ह्यातील १४३२ कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी

By अविनाश कोळी | Updated: May 17, 2023 13:32 IST

जिल्ह्यातील १ हजार ४३२ शेतकऱ्यांच्या जमिनीवरील भू-विकास बँकेचा बोजा हटविण्यास सुरुवात झाली आहे.

सांगली : जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेच्या (भू-विकास) शेतकरी सभासदांची कर्जमाफी शासनाने केली असून त्यांच्या जमिनीवरील बँकेचा बोजा हटविण्याचे काम गतिमान झाले आहे. आतापर्यंत सुमारे २५ टक्के सभासदांचा सात-बारा कोरा झाला आहे.

जिल्ह्यातील १ हजार ४३२ शेतकऱ्यांच्या जमिनीवरील भू-विकास बँकेचा बोजा हटविण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला आहे. राज्यातील २९ भू-विकास बँकांकडील ३४ हजार ७८८ कर्जदारांची ९६४ कोटी १५ लाखांची कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने मागील वर्षी घेतला होता. या निर्णयानुसार ९ नोव्हेंबर २०२२ रोजी परिपत्रक काढून या प्रक्रियेस सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातही याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

यादीत नसलेल्यांनाही लाभ

यापूर्वी कर्ज परतफेड केल्यानंतरही ज्यांच्या सात-बारावर बँकेचे नाव नजरचुकीने राहून गेले आहे, अशांचा बोजाही कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण लाभार्थ्यांची संख्या दीड हजारावर जाण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय सभासद तालुका सभासद

मिरज २८८क. महांकाळ ६९

तासगाव २४८पलूस ६७

वाळवा ११७शिराळा ३९३

जत १४९कडेगाव २६

आटपाडी ६३खानापूर १२

एकूण १४३२२ हजार २४३ हेक्टरवरील बोजा हटणार

जिल्ह्यातील एकूण १ हजार ४३२ शेतकऱ्यांचे एकूण १३३ कोटी ४३ लाखांचे कर्ज माफ झाले असून त्यांच्या २ हजार २४३ हेक्टर जमिनींवरील बँकेचा बोजा आता हटणार आहे.

आमचा बोजा हटला

तलाठी कार्यालयाकडून आमच्या जमिनीवरील बोजा हटल्याचे सांगण्यात आले आहे. फेरफार उतारा व नवा सातबारा उतारा येत्या चार दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. गतीने हे काम सुरु आहे. गावातील २५ सभासदांच्या जमिनीवरील बोजा हटला आहे.- बाबा पाटणे, शेतकरी, कवठेएकंद