शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोरदार पाऊस, पिकांसाठी पोषक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांत समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 16:21 IST

पश्चिम भागात ढगांच्या गडगडाटासह धो-धो

सांगली: जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी सोमवारी पावसाने हजेरी लावली. वाळवा, शिराळा, मिरज पश्चिम भागासह तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये ढगांच्या गडगडाटासह धो-धो पाऊस झाला. जोराच्या पावसाने शेतांसह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, संध्याकाळी जोरदार पाऊस झाला.मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस होत आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. या पावसाचे प्रमाण पश्चिम भागात अधिक होते, ऑगस्ट महिना उजाडल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. गेल्या तीन दिवसांपासून वातावरण बदलले. त्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. वाळवा, शिराळा तालुक्यासह पश्चिम भागातील काही गावांत ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी जोरदार पाऊस झाला. एकसारखा तासभर पडणार्‍या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच-पाणी झाले.आटपाडी तालुक्यात धुव्वांधार पाऊस झाला. तालुक्यात खरिपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत, त्यामुळे पिकांसाठी पोषक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांत समाधान व्यक्त केले जात आहे. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात काही गावात पावसाने हजेरी लावली. सांगली, मिरज शहर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.

आटपाडी तालुक्यात सर्वाधिक पाऊससोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आटपाडी तालुक्यात सर्वाधिक ४१.९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात दि. १९ ऑगस्ट रोजी पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ५.४, जत २, खानापूर ८.१, वाळवा ३.९, तासगाव २९, शिराळा २.४, आटपाडी ४१.९, कवठेमहांकाळ १०.४, पलूस १२.४, कडेगाव ५.१.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी