शिराळा (जि. सांगली) : शिराळा येथे शेतात काम करत असताना मधमाश्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्ध शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. शिवाजी किसन गायकवाड (वय ७०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी, दि. ९ रोजी रात्री आठच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.शिवाजी गायकवाड यांची शिराळा-पाडळी रस्त्यालगत शेती आहे. बुधवारी (दि. ४) सकाळी नऊच्या सुमारास ते आपल्या शेतात काम करत होते. यावेळी सिमेंटच्या पाइपमध्ये असलेल्या मधमाशांच्या पोळ्यातील शेकडो माश्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. काही क्षणांतच मधमाश्यांनी त्यांच्या शरीरावर जागोजागी चावा घेतला होता. या भीषण हल्ल्यात गायकवाड हे गंभीर जखमी होऊन कोसळले. त्यांना तातडीने शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले होते. पाच दिवस मृत्यूशी संघर्ष केल्यानंतर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
Web Summary : A farmer from Shirala, Sangli, died after battling for five days following a severe bee attack while working in his field. Shivaji Gaikwad, 70, succumbed to his injuries in a private hospital. He was attacked by a swarm of bees and was critically injured.
Web Summary : सांगली के शिराला में एक किसान की खेत में काम करते समय मधुमक्खी के हमले के बाद पांच दिनों तक जूझने के बाद मौत हो गई। शिवाजी गायकवाड, 70, ने एक निजी अस्पताल में दम तोड़ दिया। उन पर मधुमक्खियों के झुंड ने हमला किया और वह गंभीर रूप से घायल हो गए थे।