Sangli: तासगावात महिला तंत्रनिकेतनच्या खानावळीत स्फोट, अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:03 IST2025-01-22T18:02:49+5:302025-01-22T18:03:05+5:30

विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण 

Explosion in the canteen of Mahila Technikatan in Tasgaon Sangli | Sangli: तासगावात महिला तंत्रनिकेतनच्या खानावळीत स्फोट, अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली

Sangli: तासगावात महिला तंत्रनिकेतनच्या खानावळीत स्फोट, अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली

तासगाव : येथील शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या मेसमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मेसमध्ये जेवण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थिनींनी एकदम मेस बाहेर धाव घेतली. घटनेनंतर तात्काळ तासगाव नगरपालिकेचे अग्निशमन दल दाखल झाले. अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

तासगाव मणेराजुरी रस्त्यालगत शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन आहे. या तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी आहेत. मंगळवारी रात्री जेवणासाठी मुली मेसमध्ये आल्यानंतर काही मुली जेवणाच्या प्रतीक्षेत होत्या, तर काही मुली जेवण करीत होत्या. याच वेळी अचानक किचनमध्ये गॅसचा स्फोट झाला. आगीचा भडका उडाला.

स्फोट झाल्यानंतर सर्व मुलींनी मेसच्या बाहेर धाव घेतली. किचन पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडले होते. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी हजर झाल्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. किचनमध्ये आणखी चार गॅसचे सिलिंडर असल्याची माहिती मिळाली. कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणून सर्व सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक सचिन थोरबोले, तहसीलदार अतुल पाटोळे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मुलींमध्ये भीतीचे वातावरण

जेवणासाठी आल्यानंतर अचानक स्फोट झाल्यामुळे मेसमध्ये मोठी खळबळ उडाली. मुलींची संख्या मोठी असल्यामुळे बाहेर पडण्यासाठी सर्व मुलींनी एकदम धाव घेतली. स्फोटामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक मुलींना अश्रू अनावर झाले होते.

Web Title: Explosion in the canteen of Mahila Technikatan in Tasgaon Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.