शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

सभापतींनी अडविल्या फायली

By admin | Updated: January 3, 2017 23:28 IST

स्थायी समिती सभा : काँग्रेस नगरसेवकांचा आरोप; हाच काय पारदर्शी कारभार?

सांगली : महापालिकेतील विकास कामांच्या फायली मंजुरीनंतर सील करण्याचे अधिकार नगरसचिव व स्थायी सदस्याला असताना, सील केलेल्या फायली सभापती संगीता हारगे यांनी अडविल्या आहेत. फायली अडविण्यामागे राष्ट्रवादीचा काय हेतू आहे?, हाच का त्यांचा पारदर्शी कारभार? असा सवाल नगरसेवक दिलीप पाटील यांनी केला. तसेच सभापती हारगे यांनी, परस्पर फायली फिरविणाऱ्या ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. सभापती हारगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायी समितीची सभा झाली. या सभेत दिलीप पाटील यांनी, फायली सील करण्याची प्रक्रिया काय? असा सवाल नगरसचिवांना केला. नगरसचिवांनी उत्तर देण्यापूर्वीच सभापती हारगे यांनी, आपणच फायली थांबविल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर दिलीप पाटील, संतोष पाटील यांनी कायद्यातील तरतुदी सांगत, स्थायी सदस्य, नगरसचिवांच्या सहीने फाईल सील केली जाते. सील केलेल्या फायली थांबविण्याचे कोणालाच अधिकार नाहीत, असे सांगत, फायली थांबविल्याने त्यात भ्रष्टाचाराला वाव आहे. पारदर्शी कारभार करू म्हणणाऱ्या राष्ट्रवादीचा हाच काय पारदर्शी कारभार?, असा सवाल केला. सभापती हारगे यांनी विकास कामांच्या फायली ठेकेदारच हाताळतात. विभागप्रमुखांकडून फायली पुढे येत नाहीत. वास्तविक ही जबाबदारी विभागप्रमुखांची आहे. यापुढे ठेकेदाराने फाईल हाताळल्याचे निदर्शनास आल्यास अधिकाऱ्यासह त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. गेल्या आठवड्यात विषयपत्र नसल्याने स्थायीची सभा घेण्यात आली नाही. वास्तविक नगरसचिव कार्यालयाकडे १३ विषयपत्रे प्रलंबित होती. त्यात कीटकनाशक खरेदी, मदनभाऊंच्या स्मारकाच्या कामाचा समावेश होता. मदनभाऊंच्या स्मारकाचे काम पूर्ण होऊ नये, यासाठीच सभा घेण्यात आली नाही, असा आरोपही पाटील यांनी केला. बसवेश्वर सातपुते यांनी, मिरजेतील रोडस्वीपर सहा वर्षे पडून असून, ट्रॅक्टरला गंज चढला आहे. तो वापरात आणावा, अशी मागणी केली. प्रदीप पाटील यांनी, बदली कामगारांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव मांडला. अलका पवार यांनी, कोल्हापूर रस्त्यावरील भोबे गटारीची पाईप जोडण्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी केली. विश्रामबाग उड्डाण पुलाचे काम सुरू असून, तेथील दिवाबत्ती बंद करण्यात आल्याचे संतोष पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. यावर येत्या चार दिवसांत पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश सभापतींनी दिले. शहरातील दिवाबत्ती बंद असून, दुरूस्तीची गाडीच खराब झाली आहे. त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम संबंधित मिस्त्रीकडे आहे. त्याचे बिल देऊ नये, अशी बोळाज यांनी मागणी केली. सभेत अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामासाठी ४४ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. प्रियंका बंडगर यांनी हा स्मारकाचा प्रश्न उपस्थित केला होता. (प्रतिनिधी)वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीसाठी समितीमाजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महापालिकेकडून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील यांनी केली. यावर सभेत चर्चा होऊन समिती गठित करण्याचा प्रस्ताव महासभेकडे पाठविण्याची हमी सभापती संगीता हारगे यांनी दिली.