सांगलीत माजी उपसंरपंचाच्या हत्येनं खळबळ; गळा चिरून मृतदेह रस्त्यावर फेकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 10:05 IST2024-12-06T10:03:47+5:302024-12-06T10:05:18+5:30

बापूराव चव्हाण यांना राजकीय पार्श्वभूमी होती, तसंच त्यांचे ज्वेलरीचेही दुकाने होते.

Excitement over the murder of former deputy commissioner in Sangli; Cut the throat and threw the body on the road! | सांगलीत माजी उपसंरपंचाच्या हत्येनं खळबळ; गळा चिरून मृतदेह रस्त्यावर फेकला!

सांगलीत माजी उपसंरपंचाच्या हत्येनं खळबळ; गळा चिरून मृतदेह रस्त्यावर फेकला!

लोकमत न्यूज नेटवर्क, विटा : घानवड (ता. खानापूर) येथील माजी उपसरपंच व सराफ व्यावसायिक बापूराव देवाप्पा चव्हाण (वय ४६) यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून अज्ञातांनी निर्घृण खून केला. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले असून हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गार्डी येथील नेवरी रस्त्यावर घडली.

घानवड येथील बापूराव चव्हाण यांचे विटा येथे सोनारसिद्ध ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. त्यांचा गार्डी ते नेवरी रस्त्यावर पोल्ट्री व्यवसायही आहे. सन २०१८ ते २०२३ या कालावधीत त्यांनी घानवड गावचे उपसरपंच म्हणून उत्कृष्ट कामकाज केले होते. गुरुवारी दुपारी ३ वाजता ते गार्डी ते नेवरी रस्त्याने पोल्ट्री शेडवर बुलेट दुचाकीवरून (क्र. एम.एच.-१०-सीवाय-५२३१) निघाले होते. त्यावेळी गार्डी गावच्या बाहेर थोड्या अंतरावर गेल्यानंतर लोकवस्ती कमी असलेल्या ठिकाणी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची बुलेट दुचाकी अडवून धारदार चाकूने त्यांच्या गळ्यावर वार करून निर्घृण खून केला.

या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विटा ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या घटनेतील अज्ञात हल्लेखोरांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

अज्ञात हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. माजी उपसरपंच व सराफ व्यावसायिक बापूराव चव्हाण हे मनमिळावू व शांत आणि संयमी स्वभावाचे मितभाषी म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Excitement over the murder of former deputy commissioner in Sangli; Cut the throat and threw the body on the road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.