शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
‘सैयारा’- एक अख्खी पिढी इतकी पागल का झाली आहे?
14
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
15
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
16
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
17
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
19
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
20
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  

गतवर्षी जादा पाऊस, तरीही यंदा सांगलीत पाणीटंचाईचे ढग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:21 IST

३८३ गावांत उपाययोजनांची गरज

सांगली : गतवर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा तब्बल १६४ टक्के जादा पावसाची नोंद झाली, तरीही यंदा टंचाईचे ढग घोंगावू लागले आहेत. जिल्हा परिषदेने तयार केलेल्या टंचाई आराखड्यानुसार निम्मा जिल्हा टंचाईच्या छायेखाली आहे.७०० पैकी ३८३ गावांत टंचाईच्या उपाययोजना करावी लागू शकतात असा जिल्हा परिषदेचा अंदाज आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ५९ कोटी रुपयांचा टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. टँकरने तसेच, विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. २०२३ मध्ये ३२ टक्के पाऊस कमी झाल्याने डिसेंबरपासूनच जतमध्ये टंचाई स्थिती होती. एप्रिल-मे २०२४ मध्ये सुमारे १०० हून अधिक टँकरने जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगाव या तालुक्यांत पाणीपुरवठा करावा लागला होता.गतवर्षी जतमध्ये १३० टक्के, खानापूरमध्ये १४० टक्के आणि कडेगावमध्ये १४३ टक्के पाऊस झाला. अन्य तालुक्यांत १७५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरणात सध्या ७८.३८ टीएमसी, तर वारणा धरणात २५.३१ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाई स्थिती निर्माण झाल्यास धरणांतून पाणीपुरवठा होऊ शकतो. सध्या जतमध्ये सर्वांत कमी म्हणजे २९ टक्के पाणीसाठा आहे. तेथे मार्चपर्यंत टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या सुमारास शिराळा, मिरज, खानापूर, कडेगावमध्ये टंचाई वाढण्याचा अंदाज आहे.

मार्चअखेर पाणीपुरवठ्यासाठी १५५ गावांना ७२ टँकर तसेच ११९ विहिरी अधिग्रहित कराव्या लागू शकतात. ऐन उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल ते जूनअखेर ही संख्या वाढून ३८३ गावांना १८७ टँकर आणि २३४ विहीर अधिग्रहित करून पाणी द्यावे लागण्याची चिन्हे आहेत. यासाठी सुमारे पावणेतेरा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सिंचन योजना सुरू कराव्या लागल्यास वीजबिलांपोटी ३० कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरला आहे.

जतमध्ये सर्वाधिक होरपळएप्रिल ते जूनमधील सर्वाधिक होरपळ जत तालुक्यात होण्याची चिन्हे आहेत. ८७ गावांना टँकरची गरज भासू शकते. मिरजेत ३८, खानापुरात ११, शिराळा आणि आटपाडीत प्रत्येकी ७, कडेगावमध्ये पाच, तर कवठेमहांकाळ आणि तासगावमध्ये प्रत्येकी एका गावाला टँकरची गरज लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी