Sangli: पैशासाठी बलगवडेतील माजी सैनिकाचा खून, संशयिताची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 17:03 IST2024-09-28T17:03:33+5:302024-09-28T17:03:57+5:30
पैसे लाटण्याचा डाव

Sangli: पैशासाठी बलगवडेतील माजी सैनिकाचा खून, संशयिताची कबुली
तासगाव : बलगवडे (ता. तासगाव) येथील निवृत्त सुभेदार गणपती शिंदे यांचा खून गावातीलच वैष्णव विठ्ठल पाटील याने केल्याचे पाेलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गणपती शिंदे यांची मोटार विकून पैसे मिळवण्याच्या उद्देशाने त्यांचा खून केल्याची कबुली वैष्णव पाटील याने दिली आहे.
गणपती शिंदे यांचा बुधवारी रात्री लोखंडी गजाने मारहाण करून खून करण्यात आला होता. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताच्या शोधासाठी एलसीबीची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली होती.
गावातीलच वैष्णव पाटील याच्या हालचालीबाबत संशय निर्माण झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात रवाना करण्यात आली. संशयित वैष्णव पाटील हा मौजे देवगाव (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे असल्याची माहिती मिळाली. तिथे जाऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.