Sangli: दुचाकी घसरून पडल्याने डोक्यास गंभीर दुखापत, माजी सैनिकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 12:46 IST2025-05-13T12:45:51+5:302025-05-13T12:46:29+5:30

जत : जत-विजयपूर मार्गावर जतपासून साडे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंग ढाब्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कनमडी (जि. विजापूर) ...

Ex soldier dies after suffering serious head injury after falling off bike in jat sangli | Sangli: दुचाकी घसरून पडल्याने डोक्यास गंभीर दुखापत, माजी सैनिकाचा मृत्यू

Sangli: दुचाकी घसरून पडल्याने डोक्यास गंभीर दुखापत, माजी सैनिकाचा मृत्यू

जत : जत-विजयपूर मार्गावर जतपासून साडे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंग ढाब्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कनमडी (जि. विजापूर) येथील माजी सैनिक कामगोडा रायगोंडा आवटी (वय ५०) हे मयत झाले. ही घटना सोमवारी घडली.

जत तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या मुचंडी गावाजवळ शेजारी असणारे कनमडी या गावातील माजी सैनिक कामगोडा रायगोंडा आवटी हे कामानिमित्त कनमडीतून जतकडे येत असताना जतपासून साडे सात कि.मी. अंतरावर जत-मुचंडी रस्त्यावरील लिंग धाबा येथे दुचाकी घसरून पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. प्रथम उपचारासाठी त्यांना जत येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. जत येथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना सांगली येथे हलविण्यात आले. परंतु, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 

रात्री उशिरा या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली. मयत कामगोंडा रायगोडा आवटी हे भारतीय सैन्यात होते. सध्या ते सेवानिवृत्त असून, शेती सांभाळत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेह सायंकाळी आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Ex soldier dies after suffering serious head injury after falling off bike in jat sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.