शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
2
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
3
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
4
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
5
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
6
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
7
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
8
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
9
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
10
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
11
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
12
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
13
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
14
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
15
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
16
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
17
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
18
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
19
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
20
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पावसाचा जोर ओसरला तरी ‘वारणा’ पात्राबाहेर, कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी, ७३७ कुटुंबांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 11:53 IST

सांगलीत ४०.६ फुटांवर पाणीपातळी; चौदा जिल्हा मार्ग बंद

सांगली : कोयना, वारणा धरण क्षेत्रांसह जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर कमी झाला आहे. पण, कोयना धरणातून ९५ हजार ३००, तर वारणा धरणातून १० हजार क्युसेकने विसर्ग कमी करून २९ हजार ८०७ क्युसेकने चालू आहे. वारणा नदीचेपाणी पात्राबाहेर पडले असून, कृष्णा नदीने रात्री इशारा पातळी ओलांडून ४०.६ फुटांवर गेली आहे. पुरामुळे १४ जिल्हा मार्गांवरील वाहतूक बंद आहे. तसेच, महापालिका क्षेत्रासह वाळवा, पलूस, शिराळा तालुक्यांतील १८३ कुटुंबांतील ७३७ लोकांचे प्रशासनाने स्थलांतर केले आहे.बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण क्षेत्रात ३३ मिलिमीटर, नवजा ४४ आणि महाबळेश्वर येथे ५३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सांगली जिल्ह्यात सरासरी १३.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पाऊस कमी असला, तरी कोयना धरण ९६ टक्के आणि वारणा ९३ टक्के भरले आहे. यामुळे कोयना धरणातून ९५ हजार ३०० क्युसेक, वारणा धरणातून बुधवारी सायंकाळी १० हजार क्युसेकने विसर्ग कमी करून २९ हजार ८०७ क्युसेकने विसर्ग चालू आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दिवसभरात कृष्णा नदीची पाणी पातळी १५ फुटांनी वाढून ४०.६ फुटांवर गेली आहे. सांगली शहरातील सूर्यवंशी प्लाॅट, ईनामदार प्लाॅट, दत्तनगर, काकानगर परिसरातील नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरले आहे. नदीकाठावरील मंदिरे पाण्याखाली गेली असून, सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी व सांगलीवाडीच्या स्मशानभूमीत पाणी आले आहे. कर्नाळ चौकी ते शिवशंभो चौक या रस्ताही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद केली.

४९२ नागरिकांचे स्थलांतर पुराचा धोका वाढल्याने ४९२ नागरिकांचे महापालिका प्रशासनाने स्थलांतर केले आहे. कृष्णा नदीला पूर आल्यामुळे बाधित भिलवडी (ता. पलूस) येथील १९०, जुनेखेड ३८, गौडवाडी (ता. वाळवा) ८, वारणा नदीला पूर आल्यामुळे सोनवडे (ता. शिराळा) ९, असे एकूण १८३ कुटुंबांतील ७३७ नागरिकांचे जिल्हा प्रशासनाने स्थलांतर केले आहे.

१४ जिल्हा मार्ग बंदकृष्णा आणि वारणा नदीला पूर आल्यामुळे जिल्ह्यातील १४ जिल्हा मार्ग बंद असून, तेथील वाहतूक अन्य मार्गाने वळविली आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून, नदीकाठचे पीक पाण्याखाली गेले आहेत.तालुकानिहाय चोवीस तासांतील पाऊसतालुका -पाऊस मिलिमीटरमध्ये

  • मिरज - ९.१
  • जत - ५.७
  • खानापूर - १५.६
  • वाळवा - १५.७
  • तासगाव - १२
  • शिराळा - ३४.२
  • आटपाडी - १५.२
  • क. महांकाळ - ७.४
  • पलूस - १२.९
  • कडेगाव - १५.८

कृष्णा नदीची पाणी पातळी (फूट इंचामध्ये)

  • कृष्णा पूल कराड - ३७.९
  • बहे पूल - १९.११
  • ताकारी पूल - ५२.६
  • भिलवडी पूल - ४६.२
  • सांगली आयर्विन - ४०
  • राजापूर बंधारा - ४४
  • राजाराम बंधारा - ४०.११

जिल्ह्यातील हे रस्ते बंदशिराळा तालुक्यातील मोरणा नदीवरील कांदे-मांगले, वारणा नदीवरील चरण-कोडोली, आरळा-शित्तर, बिळाशी-भेडसगाव, कांदे-सावर्डे, पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील खटाव-नांद्रे, घोगाव-दुधोंडी, नागठाणे बंधारा, आमणापूर, भिलवडी पुलाला पाणी लागल्यामुळे पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे.

प्रमुख धरणातील पाणीसाठा, विसर्गधरण / पाणीसाठा (टीएमसी) / टक्केवारी / विसर्ग (क्यूसेक)

  • कोयना १०१.४६ /  ९६ / ९५,३००
  • वारणा ३१.५० / ९२ / २९,८०७
  • धूम १३.०६ / ९७ / ९,८६२
  • कण्हेर ९.४२ / ९३ / १०४६८
  • उरमोडी ९.६४ / ९७ / ४३६७
  • अलमट्टी १०४.५१ / ८५ / २,५०,०००