शरद पवार यांच्यामुळे महिलांचे सबलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:36+5:302021-02-05T07:25:36+5:30

. कुंडल (ता. पलूस) येथे कोरोनाकाळात उल्लेखनीय कार्य केलेल्या आशासेविका, वैद्यकीय सेवक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पलूस तालुका युवती ...

Empowerment of women due to Sharad Pawar | शरद पवार यांच्यामुळे महिलांचे सबलीकरण

शरद पवार यांच्यामुळे महिलांचे सबलीकरण

.

कुंडल (ता. पलूस) येथे कोरोनाकाळात उल्लेखनीय कार्य केलेल्या आशासेविका, वैद्यकीय सेवक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पलूस तालुका युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित मेळाव्यात बोलत त्या होत्या.

युवती राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिव स्मिता देशमुख, सरचिटणीस स्नेहल शिनगारे, राष्ट्रवादी सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा छायाताई पाटील प्रमुख उपस्थित होते.

मनाली भिलारे म्हणाल्या. कोरोना योद्ध्यांमुळे आज सामान्य जनता सुरक्षित आहे. डॉक्टर्स, आशासेविका यांनी जे कोरोनाकाळात काम केले ते अतुलनीय आहे.

शरद लाड म्हणाले, महिला सर्वच क्षेत्रांत अग्रेसर आहेत. राजकारणात त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. शरद पवार यांच्यामुळे महिलांना समाजात मानाचे स्थान मिळाले आहे.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार, डॉ. किरण भोरे, ज्ञानेश पाटील, प्रमोद भोई, पलूस तालुका अध्यक्षा नंदाताई पाटील, अरुणा जाधव, वैशाली मोहिते, मंगल शितापे, जयदीप यादव, सुरेश शिंगटे, तानाजी मोकाशी, पूजा लाड, प्राजक्ता जाधव आदी उपस्थित होत्या.

Web Title: Empowerment of women due to Sharad Pawar