शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कृष्णा नदीत तरुणाचा मृतदेह शोधताना वृद्धेचा सापडला

By admin | Updated: October 7, 2014 22:57 IST

पाच दिवसांपासून त्याचा महापालिका, हेल्पलाईन टीम, अग्निशमन दल व पोलीस नदीत शोध

सांगली : येथील कृष्णा नदीत बुडालेल्या वेदांत जितेंद्र जगताप (वय १७, रा. यशवंतनगर, सांगली) या तरुणाचा शोध घेत असताना, एका वृद्धेचा मृतदेह सापडला. आज (मंगळवार) सकाळी हा प्रकार घडला. रुक्मिणी विष्णू आरते (८०, रा. गणपती पेठ, सांगली) असे या वृद्धेचे नाव आहे. याबाबत शहर पोलिसांत नोंद आहे. वेदांत हा मूळचा सातारचा आहे. तो मेकॅनिकल डिप्लोमाच्या प्रथम वर्षात शिकत होता. महिन्यापासून तो आईसमवेत यशवंतनगरमध्ये रहात होता. २ आॅक्टोबरला तो मित्रांसोबत कृष्णा नदीवर पोहायला गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याचा शोध घेण्यात आला; मात्र तो सापडला नाही. गेल्या पाच दिवसांपासून त्याचा महापालिका, हेल्पलाईन टीम, अग्निशमन दल व पोलीस नदीत शोध घेत आहेत. मंगळवारी सकाळीही त्याचा शोध सुरू होता. त्यावेळी रुक्मिणी आरते या वृद्धेचा मृतदेह हेल्पलाईन टीमच्या हाती लागला. ही वृद्धा काल (सोमवार) रात्रीपासून घरातून गायब होती. नातेवाईकांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला. परंतु त्या कोठेच आढळून आल्या नसल्यामुळे नातेवाईक शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी एका वृद्धेचा मृतदेह सापडला असल्याचे सांगितले. मृतदेह पाहिल्यानंतर नातेवाईकांनी तो ओळखला. पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)दोन दिवसांपासून शोधमंगळवारी वेदांत जगताप यांचा सकाळीही शोध सुरू होता. त्यावेळी रुक्मिणी आरते या वृद्धेचा मृतदेह हेल्पलाईन टीमच्या हाती लागला. ही वृद्धा सोमवारपासून घरातून गायब होती. याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती.