शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यातील २६ पैकी आठ तलाव कोरडे...

By admin | Updated: November 16, 2016 23:20 IST

अत्यल्प पाऊस : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष; तीन तलावांची पाणी पातळी मृतसंचयाखाली गेल्याने चिंता

गजानन पाटील -- संख -कमी झालेला पाऊस, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष व पाण्याचा अवाजवी उपसा यामुळे जत तालुक्यात ऐन हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यातच पाण्याची पातळी कमी झाल्याने २६ तलावांपैकी ८ तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. २ मध्यम प्रकल्पांपैकी संख मध्यम प्रकल्प कोरडा पडला आहे, तर उटगी येथील दोड्डनाला मध्यम प्रकल्पात ६ टक्केच पाणीसाठा शिल्क आहे. तीन तलावांची पाणी पातळी मृतसंचयाखाली गेली आहे. म्हैसाळ योजनेतील पाणी तलावात सोडल्याने पश्चिम भागातील ८ तलावांत पाणीसाठा बऱ्यापैकी आहे. पण पावसाच्या स्रोतावर अवलंबून असलेल्या तलावातील पाणीसाठा डिसेंबरच्या मध्यापर्यंत संपुष्टात येणार आहे. पाण्याचा उद्भव साठा संपत आल्याने पुढील जानेवारी ते मे महिन्यापर्यंत दिवस कसे काढायचे? हा प्रश्न आ वासून उभा आहे. सध्याच तालुक्यात पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची टंचाई वाढू लागली आहे. तालुक्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. गेल्या सहा वर्षापासून पाऊस अत्यल्प पडल्यामुळे पाण्याची पातळी ७०० ते ८०० फुटापर्यंत खाली गेली आहे. पाण्याअभावी द्राक्षे, डाळिंबबागा काढून टाकाव्या लागल्या आहेत. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी मान्सून पावसाने जुलै महिन्यात थोड्या प्रमाणात हजेरी लावली होती. परतीच्या पावसानेही दडी दिली. परिसरात फक्त ५४ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे सिद्धनाथ, दरीबडची, तिकोंडी, मिरवाड, भिवर्गी, डफळापूर, बेळुंखी व संख मध्यम प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. तसेच पश्चिम भागातील प्रतापूर, कोसारी, तिप्पेहळ्ळी, बिरनाळ, वाळेखिंडी, सनमडी, येळवी, शेगाव या तलावांत पाणीसाठा चांगला आहे, पण जालिहाळ बुद्रुक, पांडोझरी, अंकलगी या तलावांतील पाणी पातळी मृतसंचयाखाली गेली आहे.जुलै-आॅगस्ट महिन्यामध्ये झालेल्या पावसाने सिद्धनाथ, जालिहाळ बुद्रुक, अंकलगी व दोड्डनाला प्रकल्पातील पाणीसाठ्याचा अवाजवी उपसा केला आहे. पिण्यासाठी पाणी अरक्षित ठेवण्याची आवश्यकता होती. पण पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने पाणी उपसा केला आहे. उपसा रोखण्यासाठी जत व संख पाटबंधारे विभागात कर्मचारी संख्या कमी आहे. अनेक वर्षापासून जागा रिक्त आहेत. दोड्डनाला मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी मृतसंचयाखाली आहे. डफळापूर, दरीबडची, लमाणतांडा येथेही पाणी टंचाई निर्माण झाली आहे.दरीबडची साठवण तलाव कोरडादरीबडची परिसरामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे साठवण तलाव सहा वर्षापासून पूर्णपणे कोरडा पडला आहे. तलाव बांधल्यापासून २००९ मध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर तलाव भरलाच नाही.