शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

चार वर्षात आठ पोलीस निरीक्षक -: तासगावात संगीत खुर्चीचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:10 AM

तासगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांत, तासगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाची खुर्ची ‘संगीत खुर्ची’ झाली आहे. चार वर्षात आठ पोलीस निरीक्षक झाले आहेत. जनतेतून कोणतीही तक्रार नसताना,

ठळक मुद्देठाण्यातील कर्तव्याच्या खाकी खुर्चीला राजकारणाचे काटे

तासगाव : तासगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांत, तासगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाची खुर्ची ‘संगीत खुर्ची’ झाली आहे. चार वर्षात आठ पोलीस निरीक्षक झाले आहेत. जनतेतून कोणतीही तक्रार नसताना, अधिकाऱ्यांच्या बदल्या मुदतीपूर्वीच का होतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षपणाला राजकारण्यांच्या महत्त्वाकांक्षेचे काटे बोचत असल्याची चर्चा सुरू आहे.

सामान्यातील सामान्य व्यक्ती पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आली, तर त्याची तक्रार ऐकून, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाईची भूमिका तासगाव पोलिसांनी घेतल्याचे गेल्या काही वर्षात पाहायला मिळाले. मात्र पोलिसांच्या या कर्तव्यदक्षपणाचा अडसर प्रस्थापित राजकारण्यांना सलणाराच होता. काही वर्षे तासगाव पोलीस ठाण्यात राजकीय मक्तेदारीसारखा कारभार सुरू होता. मात्र अलीकडच्या काळात पोलीस ठाण्यातील राजकीय मक्तेदारी मोडीत निघालेली आहे किंबहुना पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या पाठबळावर तासगाव पोलीस ठाण्यातील अधिकाºयांनी वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे.

मात्र जनतेतून बदलीची मागणी नसतानादेखील गेल्या काही वर्षात पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीची ‘संगीत खुर्ची’ सुरू आहे. अधिकाºयांचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच बदल्या होत आहेत. चार वर्षात तब्बल आठ अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. तासगाव तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. त्यामुळे तालुक्यातून एखादा गुन्हा दाखल झाला, तर अपवाद वगळता बहुतांश गुन्ह्यात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेपही होत असतो. मात्र राजकीय हस्तक्षेपाला बगल दिली जात असल्याने, नेत्यांचा इगो दुखावला जात आहे.पाच वर्षांतील पोलीस निरीक्षकांचा कार्यकाल...नाव कार्यकालदिलीप तळपे ३१ मे २0१५ ते 0१ जुलै २0१५जितेंद्र शहाणे 0१ जुलै १५ ते २७ एप्रिल १६अशोक कदम २७ एप्रिल १६ ते 0२ जून १६मिलिंद पाटील 0२ जून १६ ते 0३ जून १७राजन मान 0३ जून १७ ते १४ जून १७अनिल तनपुरे १४ जून १७ ते २५ जून १८उमेश दंडिल २५ जानेवारी १८ ते १७ जून १८अजय सिंदकर १६ जून १८ ते ११ जून १९राजेंद्र सावंत्रे नव्याने रूजूअधिकाºयांचा कर्तव्यदक्षपणाच राजकारण्यांना अडसर ठरत असल्याचे बोलले जात आहे. यापुढे तरी चांगल्या अधिकाºयांना कार्यकाल पूर्ण होईपर्यंत कामाची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेSangliसांगली