दाट धुक्यात पाच तास हरवली सांगली, पादचारी, वाहनधारकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 12:39 IST2022-01-08T12:38:42+5:302022-01-08T12:39:22+5:30
हवामानात अचानक बदल होत आहेत. एकीकडे धुके, अंशत: ढगाळ वातावरण असताना पाराही घसरला आहे.

दाट धुक्यात पाच तास हरवली सांगली, पादचारी, वाहनधारकांची कसरत
सांगली : शहर व परिसरासह वाळवा, मिरज तालुक्यात आज, शनिवारी पहाटेपासून धाट धुके सर्वत्र पसरले होते. सांगली शहर तब्बल पाच तास धुक्यात हरविल्याने वाहनधारक, फिरायला जाणारे नागरिक, वाहनधारकांना कसरत करावी लागली.
पहाटे पाच ते दहा वाजेपर्यंत धुके कायम होते. दाट धुक्यांमुळे पहाटे फिरायला जाणारे नागरिक, नोकरदार, विद्यार्थी व वाहनधारकांचे हाल झाले. धुक्यातून वाट काढताना त्यांना कसरत करावी लागली. दाट धुक्यांमुळे सूर्यदर्शन होऊ शकले नाही. ११ वाजल्यानंतर काही भागात सूर्यदर्शन झाले.
हवामानात अचानक बदल होत आहेत. एकीकडे धुके, अंशत: ढगाळ वातावरण असताना पाराही घसरला आहे. शनिवारी जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान २९ तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा कमाल तापमान २ अंशाने कमी असून किमान तापमान सरासरीजवळ आहे.
वाळवा, मिरज तालुक्यातही धुके
सांगली शहरासह वाळवा व मिरज तालुक्यातही धुक्यांनी हजेरी लावली. वाळवा तालुक्यात पेठ व बागणी परिसरात दाट धुके पसरले होते. मिरज शहर व पूर्व भागात काहीठिकाणी धुके होते.