मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 22:23 IST2025-09-09T22:21:30+5:302025-09-09T22:23:40+5:30
या धडकेत दुचाकीवरील संजय आनंदा धनवडे हे जागीच ठार झाले, तर सुदीप आदिनाथ पाटील (वय ३५, राहणार. दुधगाव) गाडीवरून बाजूला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले.

मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
आष्टा इस्लामपूर मार्गावर मार्गावर बावची फाट्या नजीक भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपासह मोटर सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने संजय आनंदा धनवडे (वय ४५, रा. दुधगाव, ता. मिरज) हे जागीच ठार झाले . या अपघातात मोटर सायकल वरील एक जण गंभीर जखमी झाला ट्रक ने चिरडल्याने दोन मेंढ्या ठार झाल्या तर सात मेंढ्या जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.
आष्टा पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आष्टा इस्लामपूर मार्गावर इस्लामपूरहून सांगलीकडे ट्रक क्रमांक एम एच ४५ डी १२६ बावची फाट्याजवळ वीरसिंग ज्ञानू अनुसे यांच्या घराच्या नजीक वळणावर आला असता ट्रक चालक उत्तम गणपती साळुंखे वय ४५ राहणार संजयनगर ता मिरज जि सांगली हे ट्रक चालवत होते या दरम्यान नानासाहेब ज्योतीराम अनुसे राहणार बावची हे मेंढरे घेऊन बावची कडून आष्ट्याकडे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरून जात होते उत्तम साळुंखे यांनी मद्य धुंद अवस्थेत भरधाव ट्रक मेंढ्यांच्या कळपावर घातला यात दोन मेंढ्या ठार झाल्या तसेच पाच मेंढ्या जखमी झाल्या याच दरम्यान ट्रक चालकाने मोटरसायकल क्रमांक. एमएच १० टी ५७८९) ला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील संजय आनंदा धनवडे हे जागीच ठार झाले, तर सुदीप आदिनाथ पाटील (वय ३५, राहणार. दुधगाव) गाडीवरून बाजूला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. या अपघातात नानासाहेब अनुसे यांच्या मेंढ्यांचे सुमारे ९० हजाराचे नुकसान झाले संदीप आदिनाथ पाटील राहणार दुधगाव यांनी आष्टा पोलीस ठाण्यात उत्तम गणपती साळुंखे यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यादव करीत आहेत अपघातानंतर जमावाने ट्रकचालकाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले