शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन आला अन् निलंबित झाला!

By admin | Updated: September 15, 2014 23:47 IST

पोलीसप्रमुखांचा दणका : आटपाडीच्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई

सांगली : कर्तव्यात कसूर, असभ्य वर्तन व सातत्याने दारू पिऊन ड्यूटीवर येणारे आटपाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक हरी काळे यांना निलंबित करण्यात आले. वर्तणुकीत सुधारणा करावी, अशी ताकीद देण्यासाठी काळेंना जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी आज, सोमवारी स्वत:च्या कार्यालयात बोलावले होते. मात्र, काळे यावेळीही दारू पिऊन आल्याने सावंत यांना त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा लागला. काळे यापूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. त्यानंतर त्यांची पोलीस मुख्यालयातील जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली होती. ते नेहमी दारू पिऊन ड्यूटीवर येत असत. सावंत यांनी त्यांना दोन-तीनवेळा ताकीदही दिली होती. तथापि, त्यांच्या वर्तणुकीत काहीच फरक पडला नाही. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी त्यांची आटपाडी पोलीस ठाण्याकडे बदली करण्यात आली होती. तेथेही त्यांनी असभ्य वर्तन केल्याने सावंत यांनी आज, सोमवारी त्यांना शेवटची ताकीद देण्यासाठी बोलावले होते. दुपारी साडेबारा वाजता काळे पोलीस मुख्यालयात आले. सावंत यांना भेटण्यासाठी ते कार्यालयात गेले. मात्र, यावेळीही ते दारू पिऊन आल्याचे दिसून आल्याने सावंत यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दुपारी दीड वाजता त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना निलंबित केल्याचा आदेश जारी करून त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सहा महिन्यांपूर्वीही एक हवालदार दारू पिऊन सावंत यांना भेटण्यासाठी गेला होता. त्यालाही त्यांनी निलंबित केले होते. (प्रतिनिधी)अशोभनीय कृत्यसावंत म्हणाले की, दारू पिऊन ड्यूटीवर येणे, हे अधिकाऱ्यांच्यादृष्टीने अशोभनीय आहे. दारू पिऊन ड्यूटीवर कोणी येत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. मग तो अधिकारी असो किंवा कर्मचारी. पोलीस दलात अशा प्रतिमेचे अधिकारी असतील, तर जनमाणसांत चुकीचा संदेश जाऊ शकतो. पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो.