Sangli: शेकडो गुन्हेगारांना गजाआड करणारा पोलिस श्वान ‘कूपर’ काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:29 IST2025-07-08T16:28:50+5:302025-07-08T16:29:36+5:30

सांगलीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

dog Cooper a member of the Crime Investigation Team of Sangli Police Force passes away | Sangli: शेकडो गुन्हेगारांना गजाआड करणारा पोलिस श्वान ‘कूपर’ काळाच्या पडद्याआड

Sangli: शेकडो गुन्हेगारांना गजाआड करणारा पोलिस श्वान ‘कूपर’ काळाच्या पडद्याआड

सांगली : सांगलीपोलिस दलाच्या गुन्हे शोध पथकातील श्वान कूपर याचे आज, मंगळवारी सकाळी निधन झाले. दुपारी त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदुकीच्या फैरी झाडून त्याला अखेरची मानवंदना दिली.

डॉबरमन प्रजातीच्या या श्वानाचे वय ११ वर्षे ५ महिने होते. ६ ऑगस्ट २०१९ रोजी त्याचा जन्म झाला होता. गुन्हे शोध पथकात समावेशानंतर त्याला पुण्यात श्वान प्रशिक्षण केंद्रात १० जानेवारी ३० ऑक्टोबर २०२० या कालावधीत प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर सांगली पोलिस दलात तो दाखल झाला. 

गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत त्याने तब्बल २८७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस दलाला मदत केली होती. १३ गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावला होता. २०२१ मध्ये जत येथे व २०२२ मध्ये हरीपूर (ता. मिरज) येथे अनोळखी व्यक्तींचे खून झाले होते. पोलिसांच्या हाती कोणतेही महत्त्वाचे धागेदोरे नसतानाही कूपर आपल्या क्षमतेच्या जोरावर आरोपींपर्यंत पोहोचला होता. त्याने केलेल्या मार्गदर्शनानुसारच पोलिस आरोपींनी जेरबंद करू शकले होते.

Web Title: dog Cooper a member of the Crime Investigation Team of Sangli Police Force passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.