शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल'ला प्रवेशाच्या बहाण्याने डॉक्टरची १५ लाखांची फसवणूक, नवी मुंबईतील एकाविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:14 IST

पैसे परत मागितले. मात्र, वेळोवेळी कापरी याने टोलवाटोलवी केली

सांगली : नवी मुंबईतील एम.जी.एम. मेडिकल कॉलेज, कामोठा येथे मुलाला एमडीएस (ओरल सर्जरी) साठी प्रवेश देतो, असे सांगून सांगलीतील डॉक्टरची १५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत डॉ. चंद्रकांत पंडित सगरे (वय ५४, रा. माळी कॉलनी, वारणाली रस्ता, विश्रामबाग) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित राकेशकुमार कापरी (रा. सेक्टर १९ डी, हॉटेल मेगू इनजवळ, मार्केटजवळ, वाशी, नवी मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.संशयित राकेशकुमार कापरी (पूर्ण नाव माहीत नाही.) याची आणि डॉ. सगरे यांची एप्रिल २०२४मध्ये ओळख झाली होती. तेव्हा कापरी याने नवी मुंबई येथील एम.जी.एम. मेडिकल कॉलेजमध्ये डॉ. सगरे यांचा मुलगा निनाद सगरे याला एमडीएस (ओरल सर्जरी)ला १५ लाख रुपये भरून प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले. डॉ. सगरे यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मे २०२४ ते ऑगस्ट २०२४ पर्यंत कापरी याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या खात्यावर रक्कम पाठवली. मात्र, त्यानंतर निनाद याला ‘एमडीएस’साठी प्रवेश मिळवून दिला नाही. त्यामुळे डॉ. सगरे यांनी त्याच्याकडे दिलेले १५ लाख रुपये परत मागितले. मात्र, वेळोवेळी कापरी याने टोलवाटोलवी केली.डॉ. सगरे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर डॉ. सगरे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कापरी याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor cheated of ₹15 lakhs on medical admission pretext.

Web Summary : A Navi Mumbai resident allegedly cheated a Sangli doctor of ₹15 lakhs by promising his son an MDS seat at MGM Medical College. Police have registered a case against the accused, Rakesh Kumar Kapri, for fraud after he failed to secure the admission and refused to return the money.