शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नोटांचा हप्ता नको!

By admin | Updated: November 13, 2016 23:55 IST

फायनान्स कंपन्या : बचत गटातील महिलांना दमदाटी

सांगली : कर्जाचा हप्ता देताना पाचशेच्या व हजारच्या नोटा घेणार नाही. ‘दहा मिनिटात येणार आहे, सर्व महिलांनी शंभराच्या नोटा घेऊन हप्त्याची तयारी करा’, अशी दमदाटी फायनान्स कंपन्यांकडून ग्रामीण बचत गटातील महिलांना केली जात आहे. गटातील महिलांकडे हजार, पाचशेच्या नोटा असल्याने आता करायचे काय? असा त्यांना प्रश्न पडला आहे. फायनान्स कंपन्यांच्या दमदाटीमुळे महिलांकडून पोलिस ठाण्यात धाव घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. फायनान्स कंपन्यांनी ग्रामीण भागात शिरकाव करून बचत गटातील महिलांना कर्ज पुरवठा सुरू केला आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. पंधरा ते वीस महिलांना जमा करून ते गट स्थापन करतात. त्यानंतर दहा हजारापासून ते पन्नास हजारपर्यंत त्यांना कर्ज पुरवठा केला जात आहे. आठवड्यातून एकदा कंपन्यांचे प्रतिनिधी संबंधित गावात जाऊन हप्ता वसूल करतात, पण गेल्या आठवड्यात केंद्र शासनाने हजार व पाचशेच्या नोटांवर बंदी घातली. नोटा बदलण्यासाठी पन्नास दिवसांची मुदत दिली आहे. असे असताना फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी ग्रामीण भागातील केलेल्या कर्ज पुरवठ्याचा हप्त्यासाठी जुन्या नोटा स्वीकारणार नाही, असे सांगत आहेत. या कंपन्यांचे बँकांबरोबर व्यवहार आहेत. गटाकडून घेतलेल्या हप्त्याची रक्कम ते बँकेत जमा करू शकतात. पण त्यांनी गटात महिलांना दमदाटी सुरू केली आहे. हप्त्याची रक्कम देताना शंभराच्या नोटा पाहिजेत, असा त्यांनी पवित्रा घेतला आहे. नोटा बंदी झाल्यापासून शहरातील नागरिकांकडे अजूनही नवीन नोटा आल्या नाहीत. शंभराच्या नोटाचे चलन फिरत नसल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागात तर यापेक्षा वाईट स्थिती आहे. असे असताना बचत गटाच्या महिलांकडे शंभराच्या नोटा कुठल्या येणार? हप्ता चुकला, तर कंपन्यांकडून त्यांना दंड केला जातो. जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने आता करायचे काय? असा महिलांना प्रश्न पडला आहे. जुन्या नोटांवरून त्यांना कंपन्यांच्या प्रतिनिधींशी वाद होत आहे. (प्रतिनिधी) नवीन नोटा आणायच्या कुठून? फायनान्स कंपन्या पाचशे-हजाराच्या नोटा घेण्यास तयार नाहीत. शंभर रूपयांच्या नोटांचा सध्या तीव्र तुटवडा आहे. वेळेत पैसे न भरल्यास कंपन्यांकडून दंडाची आकारणी केली जाते. या कोंडीमुळे महिलांना नाहक आर्थिक भुर्दंड होत आहे. अडवणूक : पोलिसांत जाणार? हजार, पाचशेच्या नोटा फायनान्स कंपन्यांनी स्वीकारण्यास नकार देऊन महिलांना दमदाटी करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बचत गटातील महिला पोलिस ठाण्यात धाव घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. नवीन नोटा बाजारात येईपर्यंत कंपन्यांनी जुन्या नोटा घेतल्या पाहिजेत, असे महिलांचे म्हणणे आहे.