Sangli ZP: जिल्हा परिषदेत पाठिंब्यावरून राष्ट्रवादीमध्ये दुफळी, नेत्यांमध्ये कलगीतुरा

By संतोष भिसे | Updated: March 11, 2026 13:48 IST2026-03-11T13:48:23+5:302026-03-11T13:48:55+5:30

संजय पाटील-निशिकांत पाटील आमने-सामने

Division within NCP over support in Sangli Zilla Parishad rift among leaders | Sangli ZP: जिल्हा परिषदेत पाठिंब्यावरून राष्ट्रवादीमध्ये दुफळी, नेत्यांमध्ये कलगीतुरा

Sangli ZP: जिल्हा परिषदेत पाठिंब्यावरून राष्ट्रवादीमध्ये दुफळी, नेत्यांमध्ये कलगीतुरा

संतोष भिसे

सांगली : जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेत कोणाला पाठिंबा द्यायचा या विषयावरून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यातील मतभेद जाहीर झाल्याने पक्षात उभी फूट पडल्याचे दिसत आहे.

पक्षनेते माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख आदी नेते बहुमतासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या मानसिकतेत आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मात्र प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्षांनी स्थानिक स्थिती पाहून निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नेत्यांनी महाविकास आघाडीला पाठिंब्याची भूमिका घेतली असली, तरी तसा अधिकृत निर्णय प्रदेशाध्यक्षांना कळविलेला नाही. त्यासाठी मुंबईत बोलविलेल्या बैठकीलाही जिल्ह्यातील नेते गेले नाहीत.

यादरम्यान, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार नवनिर्वाचित सदस्यांचा गट स्थापन करण्यात आला आहे. गट स्थापनेच्या अर्जावर जिल्हाध्यक्ष या नात्याने आवश्यक त्या ठिकाणी माझ्या स्वाक्षरी आहेत. अर्ज सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे, असा दूरध्वनी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला, त्यामुळे मी स्वत: उपस्थित राहिलो होतो.

गटनोंदणीच्या फाइलमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी पुरेशी काळजी घेतली. पक्षाच्या पहिल्या बैठकीपासून आजअखेर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याशी चर्चा होऊनच वेळोवेळी निर्णय घेतले आहेत. यापुढेही याच पद्धतीने कार्यवाही करण्याचा निर्णय कायम आहे.

जिल्हाध्यक्षांवर जाहीर टीका

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गटनेता नोंदणीसाठी सर्वच नेते एकत्र गेले नव्हते. अन्य नेते माध्यमांशी संवाद साधत होते, तेव्हा जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीत संजय पाटील यांनी त्यांच्याबाबत गंभीर व मतभेद दर्शविणारी वक्तव्ये केली. त्यामुळे पाठिंब्याच्या विषयावरून पक्षात दुफळी निर्माण झाल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मत विचारात घेऊन पक्षश्रेष्ठी पाठिंब्याविषयी योग्य निर्णय घेतील. त्याचा पदाधिकारी व नवनिर्वाचित सदस्य आदर करतील. - निशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

गटनेता निवडीचा निर्णय सर्वानुमते झाला होता. त्यानंतरही जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी परस्पर जाऊन आमचा बाजार करावा इतकी आम्ही वेडी माणसे नाही आहोत. आम्हाला अध्यक्षपदाची आमची मागणी आहे. त्यानुसार पाठिंब्याचा निर्णय एकत्र बसून घेतला जाईल. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत. - संजय पाटील, माजी खासदार

Web Title : सांगली ZP: समर्थन पर राष्ट्रवादी में दरार, नेताओं में कलह।

Web Summary : सांगली में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ZP गठबंधन को समर्थन देने पर विभाजित। जिलाध्यक्ष निशिकांत पाटिल और पूर्व सांसद संजय पाटिल सार्वजनिक रूप से असहमत, जिससे विभाजन हुआ। वरिष्ठ नेता महा विकास अघाड़ी का समर्थन करते हैं, जबकि पाटिल पार्टी निर्देशों की तलाश में हैं।

Web Title : Sangli NCP split over support in ZP, leaders clash.

Web Summary : NCP in Sangli faces a split over supporting a ZP coalition. District President Nishikant Patil and ex-MP Sanjay Patil publicly disagree, creating division. Senior leaders favor Maha Vikas Aghadi, while Patil seeks party directives.