शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागनिहाय आरक्षण : इच्छुकांचा अपेक्षाभंग

By admin | Updated: January 29, 2015 00:06 IST

मालगाव ग्रामपंचायत निवडणूक : सोडतीसाठी बैठक

मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. नव्याने जाहीर केलेल्या आरक्षणामुळे निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला, तर विद्यमान एका सदस्याचा अपवाद वगळता सरपंचासह इतर सदस्यांना या आरक्षणाने तारले आहेमालगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २०१५ ते २०२० या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात आरक्षण सोडतीसाठी बैठक पार पडली. तलाठी एस. डी. हंगे, सरपंच प्रदीप सावंत, जि. प. सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, काकासाहेब धामणे यांच्या उपस्थितीत लहान मुलीच्याहस्ते चिठ्ठी काढून प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. जाहीर केलेले आरक्षण असे : प्रभाग क्र. १ - अनुसूचित जाती महिला वर्ग, सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला. प्रभाग क्र. २ - अनुसूचित जातीमधील महिला, सर्वसाधारण वर्गासाठी खुला. प्रभाग क्र. ३ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण वर्गासाठी खुला. प्रभाग क्र. ४ - नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी खुला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण वर्गासाठी खुला. प्रभाग क्र. ५ - अनुसूचित जातीमधील पुरुष, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण वर्गासाठी खुला. प्रभाग क्र. ६ - सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण वर्गासाठी खुला. आगामी निवडणुकीसाठी ५० टक्के महिलांना निवडणुकीची संधी मिळणार असल्याने ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्यांमध्ये ९ महिला व आठ पुरुष अशी सदस्यसंख्या असणार आहे. महिलांच्या पन्नास टक्के आरक्षणामुळे प्रभाग क्र. २ मध्ये अनुसूचित जातीमधील महिला वर्गासाठी आरक्षण पडल्याने विद्यमान सदस्य विश्वास खांडेकर यांना त्याचा फटका बसला आहे. त्यांच्यापुढे सर्वसाधारण खुल्या वर्गातून निवडणूक लढविण्याचा पर्याय आहे. खांडेकर यांचा अपवाद वगळता सरपंच प्रदीप सावंत, काकासाहेब धामणे यांच्यासह इतर सदस्यांना या आरक्षणाने तारले आहे. जाहीर होणाऱ्या आरक्षण सोडतीसाठी आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये गर्दी केली होती. मात्र इच्छुकांच्या प्रभागात आरक्षण पडल्याने अनेकांचा अपेक्षाभंग झाला. (वार्ताहर)