शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीची काँग्रेस बरखास्त करून मला पाठिंबा द्या; प्रकाश शेंडगे यांचा प्रतीक पाटील यांच्याकडे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 17:12 IST

'आज पुन्हा वसंतदादांच्या विकासाचा रथ चालवयाचा असेल, तर शेंडगे व वसंतदादा घराण्याला एकत्र यावे लागेल'

सांगली : जत तालुका काँग्रेस बरखास्त करून २००९ मध्ये मला पाठिंबा दिला आणि २१ दिवसांत मी आमदार झालो. आता सांगली लोकसभा मतदारसंघात ती वेळ आली आहे. जिल्हा काँग्रेस बरखास्त करून मला पाठिंबा दिला, तर वसंतदादांचा विचार रुजवायला मदत होईल, अशी भूमिका ओबीसी आघाडीचे नेते व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी गुरुवारी मांडली.वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीत प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला आहे. आता विशाल पाटील यांच्यासाठी प्रतीक पाटील यांनी आंबेडकर यांना गळ घातली आहे. त्यांनी आधी शेंडगे यांच्याशी भेटून समजूत काढा, अशी सूचना काँग्रेस नेत्यांना केली. त्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी शेंडगे यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यांना पाठिंब्यासाठी आवाहन केले. त्यानंतर शेंडगे यांनी आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, ‘सांगली लोकसभा मतदारसंघातील आजची काँग्रेसची अवस्था ही २००९ ला जतमध्ये झाली होती तशीच आहे. त्यावेळी ‘जत पॅटर्न’ राबवला होता. आता पुन्हा एकदा तो पॅटर्न राबवावा, अशी भूमिका अनेक काँग्रेस कार्यकर्ते मांडत आहेत. मला भाजपची उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी काँग्रेस बरखास्त करून माझ्या पाठीशी सर्वजण उभे राहिले होते. त्यानंतर पुन्हा काँग्रेस उभा करण्याचे काम मी केले. आज काँग्रेसचा तेथे आमदार आहे. लोकसभेत काँग्रेसची तीच अवस्था आहे. वसंतदादा पाटील यांच्या विचारांची काँग्रेस टिकवायची असेल तर त्या पॅटर्नची पुनरावृत्ती करावी लागेल.

वसंतदादांची कॉंग्रेस संपवायची आहे..जिल्ह्यातील काही नेत्यांना वसंतदादांची काँग्रेस संपवायची आहे. आमचे वडील शिवाजीबापू शेंडगे हे वसंतदादांच्या तालमीत तयार झाले. आज पुन्हा वसंतदादांच्या विकासाचा रथ चालवयाचा असेल, तर शेंडगे व वसंतदादा घराण्याला एकत्र यावे लागेल. सांगलीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणतीही लाट नाही. तसेच, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मला याआधी पाठिंबा जाहीर केलेला आहे. ते ‘शब्द’ मागे घेणार नाहीत, यावर माझा विश्वास असल्याचे शेडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Prakash Shendgeप्रकाश शेंडगेPratik Patilप्रतीक पाटीलcongressकाँग्रेस