शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव पालिकेत सर्वपक्षीय डीआरडी पॅटर्नची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:19 IST

तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीला अद्याप बराच कालावधी आहे. मात्र आतापासूनच इच्छुक आणि नेत्यांकडून जुळवाजुळव सुरु आहे. गतवेळच्या निवडणुकीत ...

तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीला अद्याप बराच कालावधी आहे. मात्र आतापासूनच इच्छुक आणि नेत्यांकडून जुळवाजुळव सुरु आहे. गतवेळच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असा तिरंगी सामना झाला होता. मात्र यावेळी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून आमदार आणि खासदारांशिवाय मोर्चेबांधणी करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. शहराच्या अस्मितेसाठी शहरातीलच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत डीआरडी पॅनेल तयार करून नवा पॅटर्न राबवण्याची चर्चा शहरात सुरू आहे.

तालुक्यातील सर्वाधिक महत्वाचे सत्ताकेंद्र म्हणून तासगाव नगरपालिकेकडे पाहिले जाते. तालुक्याच्या राजकारणाचा निर्णायक कल ठरवण्याची भूमिका तासगाव शहरातूनच होते. त्यामुळे तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील यांच्याकडून शहरावर वर्चस्व ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न राहिला होता. गतवेळेच्या निवडणुकीत आर. आर. पाटील यांच्या पश्‍चात आमदार सुमनताई पाटील यांनी राष्ट्रवादीची धुरा हातात घेतली. काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी स्वत:ची ताकद आजमावून पाहिली. मात्र या निवडणुकीत खासदार संयजकाका पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून तासगावकरांनी पालिकेचा कौल भाजपला दिला.

अपवाद वगळता अनेक वर्षांपासून तासगाव शहराची सर्व सूत्रे खासदार संजयकाका पाटील किंवा तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील यांच्या ताब्यात राहिली. शहराचा कारभार अंजनी आणि चिंचणीतूनच होत असल्याबाबत अनेकदा आरोपांच्या फैरी झडल्या. दोन्ही नेत्यांच्या इर्षेतून शहराकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित होत होते. मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमुळे शहरात नाराजीचा सूर आहे.

आमदार आणि खासदारांच्या अंडरस्टँडिंगच्या राजकारणामुळे यावेळी होणाऱ्या निवडणुकीत तासगाव नगरपालिकेसाठी शहरातीलच नेत्यांकडून सक्षम तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्ही नेत्यांना वगळून शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची एकत्रित मोट बांधून डीआरडी पॅनलचा पर्याय चर्चेत आणला जात आहे. शहरातीलच कारभाऱ्यांकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या या पर्यायाला वर्षानुवर्षे अंजनी आणि चिंचणीचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या कारभाऱ्यांकडून कितपत प्रतिसाद मिळतो, यावरच या डीआरडी पॅटर्नचे भवितव्य ठरणार असून अद्याप तरी याबाबल पडद्यामागे खलबते सुरू असल्याचे दिसून येत आहे.

चौकट :

आमदार, खासदारांच्या अंडरस्टँडिंगने बदलती समीकरणे

खासदार संजयकाका पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांचे अलीकडच्या काळात एकमेकांच्या अंडरस्टँडिंगने राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे. या चर्चेवर शिक्कामोर्तब होणाऱ्या घडामोडीही सातत्याने घडताना दिसून येत आहेत. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत दोन्ही नेत्यांकडून अंडरस्टँडिंगचे राजकारण होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. ही शक्यता गृहीत धरुनच शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दोन्ही नेत्यांना वगळून स्वतंत्र मोर्चेबांधणी करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

चौकट :

चर्चेतील डीआरडी पॅटर्न

माजी आमदार दिनकरआबा पाटील, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि माजी नगराध्यक्ष डी. एम. पाटील या तीन दिवंगत नेत्यांच्या नावाची इंग्रजीतील सुरुवातीची अक्षरे एकत्रित करून डीआरडी पॅनल तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत अद्याप कोणत्याच पदाधिकाऱ्यांकडून अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून याविषयी जोरदार घडामोडी घडत असून शहराच्या अस्मितेचा मुद्दा घेऊन भेटीगाठी आणि बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.