मी जयंतरावांसोबतच, अजित पवारांच्या भेटीबाबत सांगलीच्या महापौरांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 18:54 IST2023-07-08T18:52:31+5:302023-07-08T18:54:18+5:30

सूर्यवंशी मुंबईत अजित पवार यांना भेटल्याच्या व फुलांचा गुच्छ देऊन अभिनंदन केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर चर्चेला उधाण

Disclosure of Sangli Mayor regarding Ajit Pawar visit | मी जयंतरावांसोबतच, अजित पवारांच्या भेटीबाबत सांगलीच्या महापौरांचा खुलासा

मी जयंतरावांसोबतच, अजित पवारांच्या भेटीबाबत सांगलीच्या महापौरांचा खुलासा

सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नातेसंबंधातून गेलो होतो. त्यांच्या गटात जाण्याचा कोणताही विचार नाही. मी जयंत पाटील यांच्यासोबतच असल्याचा खुलासा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी येथे केला.

सूर्यवंशी गुरुवारी मुंबईत अजित पवार यांना भेटल्याच्या व फुलांचा गुच्छ देऊन अभिनंदन केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर चर्चेला उधाण आले. त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याच्या चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना विचारणा केल्याचेही वृत्त आहे.

याविषयी पत्रकार बैठकीत ते म्हणाले, मी जयंत पाटील यांचाच कार्यकर्ता आहे. अजित पवार पाहुणे असल्याने भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या गटात जाण्याचा कोणताही विचार नाही. भविष्यात महापालिकेच्या एखाद्या कामासाठी महापौर म्हणून त्यांना भेटेन, पण वैयक्तिक स्तरावर त्यांची भेट घेणार नाही. त्यांच्याकडे जायचे असते, तर जाहीर घोषणा करून गेलो असतो. मुंबईत अजित पवारांनीही भेटीनंतर तशी घोषणा केली असती. अजित पवार यांच्या कार्यालयातून मला शक्तिप्रदर्शन मेळाव्याला येण्यासाठी फोन आला होता. शुक्रवारी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जयंत पाटील यांचाही फोन आला होता. त्यांच्याकडे बाजू मांडली आहे.

Web Title: Disclosure of Sangli Mayor regarding Ajit Pawar visit