शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"‘अलमट्टी’तून दोन लाख विसर्ग करा; तरच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर थांबेल"

By अशोक डोंबाळे | Updated: July 20, 2024 17:41 IST

मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी : स्थानिक प्रशासन निष्क्रिय असल्याची तक्रार

सांगली : सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांसमोर महापुराचे पुन्हा संकट उभे राहिले आहे; मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अलमट्टी धरणातून किमान दोन लाख क्युसेक विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक शासनावर दबाव आणा, अशी मागणी कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समिती आणि आंदोलन अंकुश यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शनिवारी केली आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार आणि आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी म्हटले आहे की, कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा (चांदोली), राधानगरी यासह सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेले काही दिवस तुफान पाऊस सुरू आहे. सर्व धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढतो आहे. तसेच कृष्णा, कोयना, वारणा, तारळी, पंचगंगा या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांचे पाणीही वेगाने वाढत आहे.परिणामी ‘कृष्णा’, ‘वारणा’ आणि ‘पंचगंगा’ या नद्यांच्या काठावरील सांगली, कोल्हापूर, सातारा या सर्व जिल्ह्यांतील शहरे आणि गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे; परंतु सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे स्थानिक प्रशासन तसेच जलसंपदा विभागातर्फे अलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामध्ये नियमबाह्यरीत्या पाणीसाठा केला आहे. वास्तविक अलमट्टी धरणातून तातडीने किमान दोन लाख क्युसेकने विसर्ग वाढवण्याची गरज आहे. तरच महापुरावर नियंत्रण करता येईल; परंतु सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासन; तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. आम्ही आपल्याशी वारंवार संवाद केला. संपर्क साधला. तुम्ही तातडीने त्याची दखल घेऊन महापूर रोखण्यासंदर्भात सांगली व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि दोन्ही जिल्ह्यांतील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे आदेशही दिले होते. यासंदर्भात आपण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगही घेतली होती. त्यावेळी कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगा बंधारा येथील पाणीसाठ्यावर लक्ष ठेवा, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या; परंतु त्या सूचनांचे पालन प्रशासनाकडून होताना दिसत नाही. अलमट्टी धरणातून सध्या किमान दोन लाख क्युसेक विसर्ग सुरू झाला पाहिजे, तरच येत्या दहा-बारा दिवसांत येऊ शकणाऱ्या महापुराच्या संकटावर नियंत्रण मिळवता येईल. पावसाचा जोर ३० ऑगस्टपर्यंत राहणार आहे आणि अलमट्टी धरण आताच भरले आहे. अशावेळी कृष्णा खोऱ्यामध्ये महापुराचा १०० टक्के धोका आहे. सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासन, तसेच जलसंपदा विभागांना याबाबत तातडीने हालचाल करण्याचे आदेश द्यावेत. अलमट्टी धरणातून तातडीने विसर्ग वाढविण्याची गरज आहे.

आताच धरणात १०० टीएमसी पाणीसाठाअलमट्टी धरणातील पाणीसाठा जवळजवळ शंभर टीएमसी झाला आहे. तसेच त्या धरणाची पाणीपातळी आताच ५१८ मीटर झाली आहे. वास्तविक ही पाणीपातळी पावसाळा संपताना असायला हवी आहे. ती आताच त्यांनी गाठली आहे. याबद्दल महाराष्ट्राच्या जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरChief Ministerमुख्यमंत्री