शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानीसह चौकशीचा खर्चही संचालकांवरच!

By admin | Updated: December 24, 2014 00:23 IST

जिल्हा बँक गैरव्यवहार : कागदपत्रांची छाननी, शुक्रवारी नोटिसा

सांगली : जिल्हा बँकेतील सव्वाचार कोटी रुपयांच्या नुकसानीप्रकरणी उद्यापासून कागदपत्रांची छाननी होणार आहे. छाननीनंतर शुक्रवारी संचालकांना नोटिसा बजाविल्या जाणार असून, नुकसानीच्या रकमेसह चौकशीच्या खर्चाची जबाबदारीही संचालकांवर निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा बँकेत २००१ ते २०१२ या कालावधित ४ कोटी १८ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका कलम ८३ खालील चौकशी अधिकारी तथा मिरजेचे उपनिबंधक मनोहर माळी यांनी ठेवला आहे. यात नियमबाह्य, अनावश्यक खर्च, सवलत, इमारत बांधकामे, बचत गटाला दिलेले मानधन, सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी, निवृत्त कर्मचाऱ्यांवरील खर्च, संचालकांचा अभ्यास दौरा, संगणक खरेदी, सोसायटीला ओटीएसखाली दिलेली सवलत, लिपिक व शिपायांची भरती यांचा प्रामुख्याने समावेश आहे. माळी यांनी चौकशीचा अहवाल कोल्हापूर विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांना सादर केला होता. त्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ८८ नुसार दोषी संचालक व तत्कालीन अधिकाऱ्यांवर नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांची नियुक्ती करण्यात आलीआहे. काल सोमवारी कोल्हापुरे यांनी जिल्हा बँकेस भेट देऊन कागदपत्रांची मागणी केली. यात ठपका ठेवलेल्या प्रकरणाचा टेस्ट आॅडिट व अनुषंगिक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. उद्या बुधवारी जिल्हा बँकेकडून ही कागदपत्रे कोल्हापुरे यांच्या हाती सुपूर्द केल्या जातील, असे बँकेच्या सूत्रांनी सांगितले. त्यानंतर कोल्हापुरे यांच्याकडून या कागदपत्रांची छाननी होऊन शुक्रवारी संचालकांना नोटिसा बजाविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नोटिशीवर म्हणणे सादर करण्यासाठी संचालकांना १५ दिवसांची मुदत मिळेल. या कालावधित वाढही होऊ शकते. संचालकांचे म्हणणे नोंदविल्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची जबाबदारी निश्चित केली जाईल. यात चौकशीच्या खर्चाचाही समावेश असेल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)सव्वाचार कोटींच्या नुकसानीची प्रकरणेप्रधान कार्यालय रंगकाम, दुरुस्ती व पोर्च बांधकामात ४.६३ लाख, सावळज शाखा इमारत बांधकामात ९९ हजार, मार्केट यार्ड आटपाडी शाखा इमारत बांधकाम २८ हजार, बँक गॅरंटी शुल्क परतीचा व्यवहार २१६.५५ लाख, वाळवा तालुका बचत गट स्वयंसहाय्यता संघास धोरणबाह्य दिलेले मानधन ६३.४७ लाख, निवृत्त अधिकारी जामदार व पाटील यांना सेवेत पुन्हा घेऊन पगारावर केलेला खर्च ६.८१ लाख, सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी ४.१७ लाख, आष्टा पश्चिम भाग सोसायटीमार्फत ओटीएस खाती नियमबाह्य सूट ४६ लाख, संचालक मंडळ अभ्यास दौरा ९८ हजार,संगणक खरेदी ७३.६७ लाख असे नुकसान झाले आहे.