शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर बाजारात महिलांची ‘धूम’ टोळी

By admin | Updated: November 17, 2014 23:24 IST

नागरिक त्रस्त : मोबाईल, दागिने लंपास करण्याचे सर्रास प्रकार

इस्लामपूर : इस्लामपूर शहरात प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी बाजार भरतो. या बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन सराईत चोरट्या महिलांनी धुमाकूळ घातला आहे. या महिला बाजारात भाजीपाला घेण्याचा बहाणा करीत पुरुषांच्या खिशातील मोबाईल आणि महिलांच्या गळ्यातील दागिने सहजपणे लंपास करीत आहेत. ही महिलांची धूम टोळी सातारा जिल्ह्यातील असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.गेल्या वर्षभरात महागड्या किमतीचे मोबाईल महिलांनी लंपास केले आहेत. गेल्या आठवडाभरात डॉ. संग्राम पाटील, बाबासाहेब पाटील, प्रकाश जाधव, संजय पाटील यांच्यासह अनेकांचे मोबाईल बाजारातून चोरीला गेले आहेत. यासंदर्भात पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. या चोरट्या महिलांच्या हातात बाजाराची पिशवी, त्यात भाजीपाला असल्याने बाजारात कोणालाही संशय येत नाही. त्यांच्यासोबत काही पुरुषही असतात. या महिलांनी मोबाईल चोरल्याची खात्री पटूनही त्यांना पकडणे शक्य होत नाही. जाब विचारल्यास त्या महिला उलट, छेड काढल्याचा आरोप करुन संबंधिताला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पुरुष सहसा या महिलांच्या नादाला लागत नाहीत. याच महिला बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारीही करतात. अनेकांनी मोबाईल चोरीची तक्रार पोलिसांत केली आहे. मात्र या चोरट्यांचा छडा न लागल्याने मोबाईल, दागिने व पाकीटमारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. (वार्ताहर)महिला पोलिसांच्या नेमणुकीची मागणीआठवड्यातील रविवार व गुरुवार या बाजारादिवशी वाळवा बझारसमोर वाहतुकीची कोंडी ठरलेली असते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी एका वाहतूक पोलिसाची नेमणूक असते. ही कोंडी काढण्याच्या कामात व्यस्त असलेल्या पोलिसाला बाजारात लक्ष ठेवता येत नाही. याचाच फायदा उठवत महिलांकडून मोबाईल चोरी केली जाते. बाजारात खासगी वेशातील महिला पोलिसांची नेमणूक केल्यास अशा चोऱ्यांवर आळा बसू शकतो.बाजार आणि बसस्थानकावरील चोरट्या महिलांचा म्होरक्या इस्लामपूर शहरातीलच असल्याचा संशय आहे. हा म्होरक्या पोलिसांनाही ‘मॅनेज’ करतो, असेही बोलले जात आहे. हा म्होरक्या बसस्थानकामागील एका ठिकाणी बसून मोबाईल व पैशाची विभागणी करीत असल्याचे समजते.