शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांच्या बोगस सहीने बदल्या, आदेश काढणाऱ्या आरोपीला मिरजेत अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 12:02 IST

मुंबई सायबर पोलिसांची कारवाई

मुंबई / मिरज : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचा ई-मेल हॅक करत महावितरण अधिकाऱ्यांचे बनावट बदली आदेश काढल्याचा धक्कादायक प्रकार राज्य सायबर विभागाच्या कारवाईत समोर आला. सायबर विभागाने या प्रकरणी मोहम्मद इलियास याकूब मोमीन (४०) याला मिरजमधून अटक केली.मूळचा मिरजचा रहिवासी असलेला इलियास हा बीई इलेक्ट्रिकल इंजिनीअर असून, त्याने हे कृत्य एकट्याने केले असावे, असा अंदाज आहे. फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांच्या नावाचा गैरवापर करून ईमेल आयडी हॅक करून बनावट आदेश काढण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, ६ अधिकाऱ्यांचे बनावट आदेश काढण्यात आलेले होते. विद्याधर महाले यांचा ईमेल आयडी हॅक करून बदलीसंदर्भात सूचना दिल्या गेल्या. त्यानंतर आदेश काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी बनावट आदेशांमार्फत पैसे उकळत होता. यामध्ये नेमका किती व्यवहार झाला आहे? किती जणांचा सहभाग आहे? याबाबत चौकशी सुरू आहे.महावितरणचा बडतर्फ अभियंता मोमीन हा महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता होता. कनेक्शन देण्यासाठी लाच घेताना सापडल्याने त्यास बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर त्याने कंत्राटदार म्हणून काम सुरू केले होते. विजेचे कनेक्शन देतो म्हणून त्याने अनेकांकडून पैसे उकळल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. बुधवारी मिरजेत आलेल्या सायबर पोलिसांनी त्यास अटक करून मुंबईला नेले. या प्रकरणामुळे मिरजेत तसेच महावितरण विभागात खळबळ उडाली होती.

फडणवीसांची सही कॉपी पेस्ट केलीआरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने बनावट पद्धतीने काढलेल्या बदली आदेशावर गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही कॉपी पेस्ट केल्याचेही समोर आले.या अधिकाऱ्यांचे बनावट आदेश...गणेश मुरलीधर असमर (उपकार्यकारी अभियंता), दुर्गेश जगताप (सहायक अभियंता), मनीष धोटे (सहायक अभियंता), यशवंत गायकवाड (सहायक अभियंता), ज्ञानोबा राठोड (सहायक अभियंता) आणि योगेश आहेर (सहायक अभियंता)

टॅग्स :SangliसांगलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmahavitaranमहावितरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस