Devendra Fadanvis : 'घरांची पडझड, शेती-पिकांचं नुकसान, 70 एकर जागेत पुनर्वसनाची मागणी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 17:34 IST2021-07-29T17:01:00+5:302021-07-29T17:34:02+5:30
Devendra Fadanvis : मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. चिपळूणसारख्या ठिकाणी आलेल्या पुरामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झाल, तर अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

Devendra Fadanvis : 'घरांची पडझड, शेती-पिकांचं नुकसान, 70 एकर जागेत पुनर्वसनाची मागणी'
सातारा - भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. बुधवारी त्यांनी पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरीमधील गावऱ्यांची भेट घेतली. 23 जुलै रोजी आंबेघरमध्ये दरड कोसळून 15 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गावातील नागरिकांची शाळेत निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यावेळी गावकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून जेवणही केलं. त्यानंतरस आज सांगली जिल्ह्यातील वाळवा गावाला भेट दिली.
मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. चिपळूणसारख्या ठिकाणी आलेल्या पुरामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झाल, तर अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, साताऱ्यातील आंबेघरमध्येही दरड कोसळून 15 जणांचा मृत्यू झालाय. सांगलीमध्येही पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी घरे पडली आहेत, घरांची पडझड झाली आहे. शेतीचं आणि शेती पिकांचंही नुकसान झालं आहे. त्यामुळे, फडणवीस यांनी आज सांगलीतील वाळवा गावाला भेट दिली.
काही घराची पडझड झाली आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 29, 2021
शेती आणि पिकांचे सुद्धा मोठे नुकसान आहे.
मनुष्यहानी टळली, हेच सुदैव.
७० एकर जागेत पुनर्वसन करण्यात यावे अशा स्थानिकांच्या मागण्या आहेत. आपल्या सर्व मागण्या राज्य सरकारकडे मांडण्यात येतील.
📍वाळवा, सांगली. pic.twitter.com/qh9rD4aH6f
सांगलीच्या वाळवा गावातील विविध ठिकाणांना भेटी देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. कंबरेइतके पाणी या गावात होते. घरातील सर्व वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही घराची पडझड झाली आहे. शेती आणि पिकांचे सुद्धा मोठे नुकसान आहे. मनुष्यहानी टळली, हेच सुदैव. ७० एकर जागेत पुनर्वसन करण्यात यावे, अशा स्थानिकांच्या मागण्या असल्याचे फडणवीस यांनी ट्विटरवरुन सांगितले. तसेच, आपल्या सर्व मागण्या राज्य सरकारकडे मांडण्यात येतील, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले. दरम्यान, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खा. संजय पाटील, सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख हेही यावेळी दौऱ्यात सहभागी होते.
वाढीव मदत मिळणं गरजेचं
दरडग्रस्तांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'नुकसान खूप मोठं आहे. या सर्व दरडग्रस्तांच पुनर्वसन होणं गरजेचं आहे. शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालंय. अशा घटनांच्या वेळी मिळणारी मदत तोकडीच असते. पण त्यांना वाढीव मदत मिळणं अपेक्षित आहे. तात्पुरती नाही तर शक्य ती मदत परमनंट करावी लागेल', असे मत त्यांनी साताऱ्यात व्यक्तं केलं होतं.