शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

विकास कामांसाठी भरीव निधी देवू : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:18 IST

कवठेपिरानसह आठ गावातील विविध विकास कामांना निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देविकास कामांसाठी भरीव निधी देवू : चंद्रकांत पाटीलकवठेपिरान येथे आयोजित विविध विकास कामांचा शुभारंभ

सांगली : कवठेपिरानसह आठ गावातील विविध विकास कामांना निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.कवठेपिरान येथे आयोजित विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भिमराव माने, हुतात्मा दुध संघाचे गौरव नायकवडी, शेखर इनामदार, सरपंच सौ. गायकवाड यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी हिंदकेसरी पै. मारूती माने विकास कार्यकारी सोसायटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या हिंदकेसरी पै. मारूती माने यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच 3 कोटी 65 लाख रूपये खर्चाच्या मुख्यमंत्री पेयजल नळपाणी पुरवठा योजनेचा व 4 कोटी रूपये खर्चाच्या पूरसंरक्षक घाटाच्या कामाचा शुभारंभ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी नुतन खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कवठेपिरानसह आठ गावातील विविध विकास कामांना लागणारा निधी कमी पडू देणार नाही. प्रामुख्याने या परिसरात आवश्यक असणारे ग्रामीण रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण करण्यात येतील. शिवप्रतिष्ठानतर्फे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीसाठीही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाईल.कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, शासन शेती आणि शेतकरी यांना प्राधान्य देवून विविध योजना, ध्येय, धोरणे राबवत आहे. कृषि कर्जमाफी, कोतवालांची मानधन वाढ, शेतकरी सन्मान योजना यासारखे अनेक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय शासन राबवित आहे.खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना सर्वसामान्य माणसांसाठी अखंड काम करू. सर्व सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न समजवून घेऊन काम करू अशी ग्वाही दिली.भिमराव माने यांनी कवठेपिरानसह आठ गावातील विकास कामे मोठ्या प्रमाणावर व्हावीत, दर्जावाढ केलेले रस्ते, शिवसृष्टी यासारखी कामे प्राधान्याने व्हावीत अशी विनंती केली.यावेळी कवठेपिरान पंचक्रोशीतील नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSangliसांगली