शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्षांचा चेंडू अजय पाटलांच्या कोर्टात

By admin | Updated: December 23, 2015 01:20 IST

राजीनामा लांबणीवर : तासगावात भाजपचे इच्छुक नगरसेवक वेटिंगवर

तासगाव : राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष सुरेश थोरात यांची भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवकांसोबत मंगळवारी बैठक झाली. यावेळी नगरसेवक अजय पाटील यांच्याशी चर्चेनंतरच राजीनामा देणार असल्याची भूमिका घेत, थोरातांनी राजीनाम्याचा चेंडू पाटलांच्या कोर्टात टोलवला. त्यामुळे उपनगराध्यक्षांचा राजीनामा लांबणीवर पडला असून, भाजपच्या इच्छुकांना वेटिंगवर राहावे लागले आहे.पालिकेत काका गटाच्या नगरसेवकांचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपद भाजपच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्यासंदर्भात मंगळवारी पालिकेत पक्षीय बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपनगराध्यक्ष सुरेश थोरात, पक्षप्रतोद अनिल कुत्ते, नगरसेवक शरद मानकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुरेश थोरात यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षप्रतोद अनिल कुत्ते यांच्यासह नगरसेवकांनी केली. मात्र थोरात यांनी, राजीनामा देण्यासाठी माझी कोणतीच हरकत नाही. मात्र माजी नगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक अजय पाटील यांच्याशी चर्चा केल्याशिवाय राजीनामा देणार नसल्याची भूमिका घेतली. अजय पाटील यांच्या आदेशानंतरच राजीनामा देणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. त्यामुळे मंगळवारी थोरात राजीनामा देतील, ही भाजपच्या नगरसेवकांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या नगरसेवकांना प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.पालिकेच्या राजकारणात आर. आर. आबा गटात सद्यस्थितीत दोन गट आहेत. नगराध्यक्ष बदलावेळी पक्षांतर्गत गटबाजीदेखील चव्हाट्यावर आली होती. त्यापैकी भाजपशी सोयरिक केलेल्या गटाची सर्व सूत्रे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान स्वीकृत नगरसेवक अजय पाटील यांच्याकडे असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या सभापती निवडीत आबा गटाच्या अनुराधा पाटील यांनाही अजय पाटील यांच्या सूचनेनंतर काका गटाने पद दिल्याची चर्चा आहे. तसेच उपनगराध्यक्ष सुरेश थोरातही पाटील यांच्यासोबत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर थोरातांचा निर्णय अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.उपनगराध्यक्ष पदावरुन सद्या तागावात राजकीय चर्चेला उत आला आहे. अजय पाटील यांच्या आदेशानंतरच राजीनामा देणार असल्याचे थोरात यांनी सांगीतल्यामुळे पाटील आता थोरात यांना कोणता सल्ला देणार याचीही चर्चा सुरु आहे. यामुळे राजीनाम्यास आता विलंब होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)भाजपचे ‘ताकही फुंकून’ उपनगराध्यक्ष थोरात यांनी मंगळवारी राजीनामा न दिल्यामुळे भाजपचे नगरसेवक नाराज झाले. एकहाती वर्चस्व असूनही थोरातांच्या राजीनाम्यासाठी वेटिंग करावे लागत असल्याची नाराजी नगरसेवकांनी व्यक्त केली. मात्र आबा गटातील काही नगरसेवकांची भाजपशी सत्तेत सोयरिक असल्यामुळे आणि वर्षभरावर पालिकेच्या निवडणुका असल्यामुळे भाजपच्या कारभाऱ्यांकडून ताक फुंकून पिण्याचा प्रकार केला जात आहे.