शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चांदोली-वारणावती येथे अत्याधुनिक भूकंप मापन यंत्र बसवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 15:45 IST

Earthquake KoynaDam Sangli : चांदोली-वारणावती ( ता.शिराळा) येथे मातीचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण झाले, तेव्हापासून कोयना धरण व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात भूकंपाचे केंद्रबिंदू आहेत, त्यामुळे वारणावती येथे भूकंप मापन यंत्र बसविण्यात आले मात्र, आता हे यंत्र कालबाह्य झाले आहे. याठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी नाही, त्यामुळे हे भूकंप मापक कार्यालय असून नसल्यासारखे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी अत्याधुनिक भूकंप मापन यंत्र बसवावे व अधिकारी,कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. हीच अवस्था कोकरूड येथील केंद्राची आहे.

ठळक मुद्दे चांदोली-वारणावती येथे अत्याधुनिक भूकंप मापन यंत्र बसवण्याची मागणी जुने भूकंप मापन यंत्र कालबाह्य

विकास शहाशिराळा  : चांदोली-वारणावती ( ता.शिराळा) येथे मातीचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण झाले, तेव्हापासून कोयना धरण व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात भूकंपाचे केंद्रबिंदू आहेत, त्यामुळे वारणावती येथे भूकंप मापन यंत्र बसविण्यात आले मात्र, आता हे यंत्र कालबाह्य झाले आहे. याठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी नाही, त्यामुळे हे भूकंप मापक कार्यालय असून नसल्यासारखे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी अत्याधुनिक भूकंप मापन यंत्र बसवावे व अधिकारी,कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. हीच अवस्था कोकरूड येथील केंद्राची आहे.चांदोली धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली, त्यावेळी १९८६ मध्ये याठिकाणी भूकंप मापन यंत्र बसविण्यात आले. यामध्ये हाताने या यंत्रातील कागद बदलणे, यंत्राद्वारे निघालेल्या आलेखावरून किती रिकटर स्केलचा भूकंप झाला याचा निष्कर्ष काढला जातो. आज या यंत्रास ३२ वर्षे झाली, अनेक नवीन तंत्रज्ञान आले मात्र आजही हे जुनेच यंत्र वापरले जाते. हे यंत्र अनेक वेळा बंद पडले आहे. भूकंप झाल्यावर हे यंत्र बंद पडल्यास इतर कार्यालयाकडून माहिती घेऊन भूकंपाचे गणित मांडले जाते.हे यंत्र जुने झाले त्याचबरोबर गेल्या काही वर्षापासून याठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी नाही.तेथे असणारे सुरक्षा रक्षक या यंत्रातील कागद बदलणे , नोंदी ठेवणे अशी कामे करीत आहेत तर काही वेळा निवृत्त कर्मचाऱ्यांना बोलावून भूकंपाचे गणित मांडले जाते. चांदोली धरण हे महत्त्वाचे ठिकाण आहे, त्यामुळे येथे भूकंप मापन केंद्र आधुनिक पद्धतीचे तसेच प्रशिक्षित कर्मचारी असणे आवश्यक आहे.

कर्मचारी नाहीत म्हणून यंत्र तसेच कार्यालयही बंदकर्मचारी नाहीत म्हणून चिखली (संगमेश्वर), साखरपा , मराठवाडी(सातारा) येथील भूकंप मापन यंत्र बंद आहेत तसेच कार्यालयही बंद करण्यात आली आहेत. आता चांदोली (वारणावती) व कोकरूड येथे ही कार्यालये व यंत्रे सुरू आहेत. चांदोली व कोकरूड या दोन्ही ठिकाणी सुरक्षा रक्षकच केंद्र चालवत आहेत. प्रयोग शाळा सहाय्यक पदाचे कर्मचारी निवृत्त झाले आहेत मात्र अजूनही या रिक्त जागा भरलेल्या नाहीत.

टॅग्स :EarthquakeभूकंपKoyana Damकोयना धरणSangliसांगलीshirala-acशिराळा