शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाच्या कर्जांना मुदतवाढीची कृती समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST

सांगली : राज्यभरात लॉकडाऊन शिथिल होत असले तरी प्रवासी वाहतूक अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे बँका व ...

सांगली : राज्यभरात लॉकडाऊन शिथिल होत असले तरी प्रवासी वाहतूक अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे बँका व वित्तीय कंपन्यांनी रिक्षांच्या कर्जांना मुदतवाढ देण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली. मिरजेत यासंदर्भात मंगळवारी विविध रिक्षा संघटनांची बैठक झाली.

पॅगो प्रवासी रिक्षा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले म्हणाले की, लॉकडाऊन शिथिल झाल्याने कर्जवसुलीसाठीचा तगादा सुरू होण्याची शक्यता आहे. कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे यापूर्वी काही रिक्षाचालकांनी आत्महत्याही केल्या आहेत. तशी वेळ पुन्हा येता कामा नये. यासाठी लॉकडाऊन १०० टक्के शिथिल होईपर्यंत आणि रेल्वे, बसवाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत कर्जांना स्थगिती मिळावी. तशा सूचना शासनाने बॅंका व वित्तसंस्थांना द्याव्यात.

कर्जाचे हप्ते, व्याज त्यावरील दंडव्याज वसुलीसाठी रिक्षाचालकांना धमकावण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. भीती घालून रिक्षा ओढून नेण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्याला विरोध करण्याचे बैठकीत ठरले. यावेळी राजू रसाळ, अजमुद्दिन खतीब, मोईन खताळ, तुषार मोहिते, शरीफ काझी, शिवाजी जाधव, रशीद शेख, बाळू खतीब, अरीफ शेख, अजित पाटील, महेश सातवेकर, सुहास कांबळे, प्रदीप फराटे, शाहीर खराडे, प्रकाश चव्हाण, अजित नाईक

संतोष ठोंबरे, तानाजी फडतरे, प्रकाश कांबळे, अनिल यादव, सुखदेव कोळी आदी उपस्थित होते.

चौकट

महाराष्ट्रभर रेल्वे, एसटी व खासगी प्रवासी वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने सुरू होईपर्यंत रिक्षा व्यवसाय सुरळीत होणार नाही. कमाई सुरू झाल्यावरच कर्जाचे हप्ते भरण्याचा निर्णय रिक्षाचालकांनी घेतला. रिक्षा व्यवसाय बचाव कृती समितीतर्फे तसे निवेदन निबंधकांना देण्याचाही निर्णय झाला.

चौकट

निबंधकांना निवेदन देणार

महाराष्ट्रभर रेल्वे, एसटी व खासगी प्रवासी वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने सुरू होईपर्यंत रिक्षा व्यवसाय सुरळीत होणार नाही. कमाई सुरू झाल्यावरच कर्जाचे हप्ते भरण्याचा निर्णय रिक्षाचालकांनी घेतला. रिक्षा व्यवसाय बचाव कृती समितीतर्फे तसे निवेदन निबंधकांना देण्याचाही निर्णय झाला.