दलित महासंघाच्या नेत्याचा सांगलीत धारदार शस्त्राने खून, जमावाच्या हल्ल्यात हल्लेखोरही गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:39 IST2025-11-12T11:38:22+5:302025-11-12T11:39:25+5:30
जमावाने हल्लेखोरास पकडून मारहाण केली

दलित महासंघाच्या नेत्याचा सांगलीत धारदार शस्त्राने खून, जमावाच्या हल्ल्यात हल्लेखोरही गंभीर जखमी
सांगली : सांगलीच्या गारपीर चौकात मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारात अज्ञात हल्लेखाराने दलित महासंघाच्या मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते (वय ४१) यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून केला. त्यानंतर जमावाने हल्लेखोरावर हल्ला केला. त्यात हल्लेखोरही गंभीर जखमी झाला आहे.
मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता. घराजवळ मांडवही घातला होता. मांडवात कार्यक्रम सुरु असताना अशातच मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास काही अज्ञाताने त्यांच्यावर चाकूने वार केले. यात रक्तबंबाळ अवस्थेत ते खाली कोसळले.
जमावाने हल्लेखोरास पकडून मारहाण केली. यात तोही गंभीर जखमी झाला. त्यानंतर मोहिते यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस प्रमुखांनी तातडीने धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.