सांगली: डाळिंब बागेत गांजाची लागवड, माणिकनाळमध्ये १३३ किलो गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 13:24 IST2022-08-04T13:22:29+5:302022-08-04T13:24:38+5:30
या गांजाची किंमत १३ लाख रुपये आहे.

सांगली: डाळिंब बागेत गांजाची लागवड, माणिकनाळमध्ये १३३ किलो गांजा जप्त
माडग्याळ : माणिकनाळ (ता.जत) येथे महासिद्द लक्ष्मण बगली यांच्या शेतातील डाळींबाच्या बागेत छापा टाकून १३ लाख ३९ हजार १०० रुपयांचा १३३ किलो ९१ ग्रॅम ओला गांजा उमदी पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई काल, बुधवारी केली. पोलिसांनी संशयित महासिद्ध बगली याला अटक केली आहे.
महासिद्द लक्ष्मण बगली हा कुटुंबासमवेत गावात राहतो. डाळिंबाच्या शेतातील गांजाची लागवड केल्याची माहिती उमदी पोलिसांना मिळाली होती. यानंतर सहा.पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी बगली याच्या शेतात छापा टाकला. त्याच्या डाळींब बागेत पाच ते सहा फुट उंचीची गांजाची लहान-मोठी झाडे सापडली. त्याचे वजन सुमारे १३३ किलो ९१ ग्रॅम होते. त्याची अंदाजे किंमत १३ लाख ३९ हजार १०० रुपये आहे.
याबाबतची फिर्याद हवालदार श्रीशैल वळसंग यांनी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पंकज पवार करीत आहेत.