शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारदारांच्या उसाला आले तुरे

By admin | Updated: November 26, 2015 00:11 IST

शेतकरी हतबल : कारखान्यांबद्दल नाराजी

अशोक डोंबाळे ल्ल सांगलीशासनाच्या निधीतून शेतकऱ्यांना एफआरपीची सर्व रक्कम देण्याऐवजी, काही कारखान्यांकडून ठेवीच्या नावाखाली प्रति टन १४७ रूपये कपात करून घेतली आहे. या कपातीस काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता. या शेतकऱ्यांची रक्कम परत केली, पण सध्या या शेतकऱ्यांची साखर कारखानदारांकडून अडवणूक केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी ठेवी कपातीस विरोध केला, त्यांच्या उसाला तुरे आले तरीही, तो तोडून नेण्यास वाळवा तालुक्यातील कारखानदारांनी नकार दिल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या प्रश्नावर शेतकरी संघटनांनी मात्र ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ अशी भूमिका स्वीकारली आहे. पाऊस कमी झाल्यामुळे ऊस वाळू लागला आहे. रासायनिक खते, मजुरीचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. या गोष्टीचा विचार न करता, साखर कारखानदार मात्र साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना एफआरपीपासून वंचित ठेवत आहेत. या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह अन्य संघटनांनीही आवाज उठविल्यामुळे राज्य शासनाने कारखानदारांना एफआरपीची रक्कम देण्यासाठी बिनव्याजी पैसे देण्यास बँकांना हमी दिली. त्यानुसार प्रत्येक साखर कारखान्यास पैसेही वर्ग झाले. पण, साखर कारखान्यांनी आर्थिक अडचणीचे कारण पुढे करून प्रति टनास ऊस उत्पादकांकडून १४७ रूपये ठेवीच्या नावाखाली कपात केली. या कपातीस आष्टा, तुंग, समडोळी, मौजे डिग्रज, कवठेपिरान, दुधगाव, कारंदवाडी येथील काही शेतकऱ्यांनी विरोध केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी सहमतीपत्रही भरून दिले नाही. या शेतकऱ्यांना साखर कारखानदारांनी पैसे दिले. पण, यावर्षीच्या गळीत हंगामासाठी नोंदणी करूनही संबंधित शेतकऱ्यांचा ऊस गाळपास नेण्यास नकार दिला आहे. याबद्दल शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांना विचारले असता, आम्हीच कपातीस विरोध करणाऱ्यांचा ऊस न तोडण्याची सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. साखर कारखानदार प्रशासनाच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी कोंडीत सापडला आहे. उसाला चौदा महिने झाल्यामुळे तुरे आले आहेत. तरीही तो ऊस तोडला जात नाही.‘वसंतदादा’कडून बिलच नाही : सुनील फराटेसर्वोदय साखर कारखान्याकडून ऊस नेला जात नाही म्हणून शेतकरी वसंतदादा साखर कारखान्याकडे ऊस पाठवित आहेत. परंतु, वसंतदादा कारखान्याने या गळीत हंगामामध्ये आतापर्यंत १ लाख ४० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तरीही मौजे डिग्रज, तुंग भागातील एकाही शेतकऱ्याला दीड महिन्यात बिल मिळालेले नाही. कारखान्याकडे याबाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. थोड्याच दिवसात देतो, एवढेच उत्तर मिळत आहे, अशी तक्रार स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे.शेतकरी झाले हतबल ज्या शेतकऱ्यांनी कपातीस विरोध केला नाही, त्यांचा ऊस तोडून नेला आहे. या भेदभावाबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शेतकरी संघटनाही गप्प असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेवटी शेतकऱ्यांची इच्छा नसताना अन्य कारखान्यांकडे ऊस जात आहे; पण तेथेही पैसे मिळत नसल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.