शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांचा सांगलीत शिरकाव

By admin | Updated: September 25, 2014 23:28 IST

सावधान : सणासुदीचे दिवस; बँका, सराफ कट्टा ‘टार्गेट’

सचिन लाड - सांगली -विजयादशमी दसरा आणि दिवाळी हे सणासुदीचे दिवस असल्याने बाहेरील जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांनी सांगलीत शिरकाव करून, बँका व सराफ कट्टा ‘टार्गेट’ केले आहे. बँकेत पैसे काढून व सराफी दुकानातून दागिने खरेदी करुन येणाऱ्या नागरिकांना लुबाडण्याचा उद्योग या टोळीने सुरु केला आहे. अवघ्या दोन ते तीन मिनिटात लाखोंच्या घरात हात मारुन चोरटे पसार होत आहेत. यामुळे नागरिकांनीच सोने खरेदी करताना व बँकेतून पैसे काढल्यानंतर सावधानता बाळगायला हवी. महिला व नागरिक दागिने व लाखो रुपयांची रोकड बॅगेत ठेवतात. ही बॅग त्यांच्या हातात असते. ती लांबविण्यास चोरट्यांना कोणतीही मेहनत घ्यावी लागत नाही. पोलिसांच्या सूचनेला कोलदांडा दिल्या जात आहेत. लुटीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे. मात्र अलीकडे गुन्हेगारांच्या चोरी करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. हे गुन्हेगार पंचवीस ते तीस वयोगटातील आहे. त्यांना शोधून रेकॉर्डवर आणणे आव्हान झाले आहे. यासाठी पोलिसांनी अनेकदा विशेषत: जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी सराफ व बँकांना सीसी टीव्ही कॅमेरा दुकानात तसेच बाहेरही लावण्याची सूचना केली होती. परंतु या सूचनेचे पालन केले नाही. परिणामी दुकानाबाहेर लुटीची घटना घडली, तर चोरट्यांचा शोध घेण्यात कोणतीच मदत होत नाही. यामुळे ज्याला लुटले आहे, त्याची तपासात मदत घेतली जाते.रक्कम काढल्यानंतर नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याची सूचना देणारे फलक लावण्यासाठी बँकांना आवाहन केले आहे. बँकांची बैठक बोलाविली आहे. त्यांना बँकेच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची सूचना देणार आहे. बँका व सराफ कट्टा परिसरात पथकास गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत.-प्रकाश गायकवाड, पोलीस उपअधीक्षक, सांगलीपोलीस बंदोबस्तात... गुन्हेगार चोरीतविधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. नवरात्रोत्सव सुरु आहे. सकाळी दुर्गा दौड, रात्री दांडिया, तसेच उमेदवारांकडून अर्ज भरण्याची लगबग... या सर्वांसाठी सध्या पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. ही चोरट्यांना चालून संधी आली आहे. चोरट्यांची ही टोळी बाहेरील जिल्ह्यातून आली आहे. चोरटे दागिने व व रोकड असलेल्या बॅगा लंपास करीत आहेत.बँकेत व सराफी दुकानात नेहमीच गर्दी असते. या गर्दीत साधू-संत आहेत की चोरटे, हे कोणाला कसे कळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एखादा हात मारण्यासाठी किमान चार ते पाचजण बँक किंवा सराफ कट्टा परिसरात घुटमळतात. यामध्ये ग्राहकाच्या मागावर एक, बाहेर दोघेजण वाहन घेऊन उभे असतात, तर चौथा हातातील बॅग पळविण्यासाठी सज्ज असतो.