कवठेएकंदमध्ये पुतण्याकडून चुलत्याचा खून; आकस्मिक मृत्यूचा बनाव उघडकीस
By अविनाश कोळी | Updated: April 27, 2025 12:48 IST2025-04-27T12:48:38+5:302025-04-27T12:48:38+5:30
तासगाव पोलिसांचा तपास : खुनानंतर आकस्मिक मृत्यूचा बनाव उघडकीस.

कवठेएकंदमध्ये पुतण्याकडून चुलत्याचा खून; आकस्मिक मृत्यूचा बनाव उघडकीस
अविनाश कोळी/ सांगली, लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : किरकोळ वादातून रागाच्या भरात चुलत्याच्या डोक्यात चिनी मातीची भरणी घालून खून केल्याची घटना कवठेएकंद (ता. तासगाव) येथे उघडकीस आली आहे. पुतण्या सुबहान उस्मानगणी तांबोळी (वय २३) याने त्याचे चुलते मिरासो बांबू तांबोळी (वय ६२) यांचा खून केला.
खुनाच्या घटनेनंतर जिन्यावरून चढताना चिनी मातीची बरणी डोक्यात पडून आकस्मिक मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हा आकस्मिक मृत्यू नसून खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर संशयित आरोपीला अटक करून तासगाव पोलिसांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, २४ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता मिरासो बाबू तांबोळी हे चिनी मातीची बरणी डोक्यावर घेऊन जिन्यावर चढत असताना पडून पडल्यानंतर डोक्यावर भरणे पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्यांना तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते यावेळी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती तेथे शेव विच्छेदन करण्यात आले होते शेवटचे दोन अहवाल आल्यानंतर हा आकस्मिक मृत्यू नसल्याचे निदर्शनास आले त्यानंतर तासगाव पोलिसांनी पोलीस उपाधीक्षक आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी तपास