शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Accident News: कारची ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठिमागून जोराची धडक, कोल्हापुरातील दाम्पत्य जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:31 IST

ट्रॅक्टर चालक पसार

कवठेमहांकाळ : मिरज–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथे आज, मंगळवारी (दि. २४) सकाळी भीषण अपघात झाला. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला कारची पाठिमागून जोराची धडक बसली. या अपघातातकोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. संतोष गायकवाड व ॲड. वंदना गायकवाड (वय ४३) अशी मृतांची नावे आहेत. ते कोल्हापूरहून पंढरपूरकडे जात असताना हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास शिरढोण गावाच्या हद्दीत महादेव रेस्टॉरंटसमोर हा अपघात घडला. संतोष गायकवाड हे पत्नीसोबत कारने (एमएच ०९ एफ.जे २८१५) मिरजकडून पंढरपूरकडे जात होते. दरम्यान, रस्त्याकडेला उभी असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली ट्रॅक्टर क्र. (एमएच ०९ सीजे २६७१), ट्रॉली क्र. (एमएच १३ टी ०९३९) ला त्यांच्या कारची पाठिमागून जोराची धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भागाचा चकाचुरा झाला होता. यात संतोष गायकवाड व ॲड. वंदना गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालक पसारअपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अनिल सावळे, उपनिरीक्षक अरुण पाटील, पोलीस कर्मचारी महेश पौटे व श्रीकांत चालक थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ पंचनामा करून मदतकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्याला हातभार लावला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. काही काळवाहतूक विस्कळीत अपघातग्रस्त दोन्ही वाहने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला हलविण्यात आली. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Accident: Couple Killed as Car Hits Tractor Trolley

Web Summary : A tragic accident near Shirgaon claimed the lives of a Kolhapur couple. Their car collided with a stationary tractor-trolley, resulting in their immediate death. Police are investigating.