CoronaVirus Lockdown :तामिळनाडूतील 480 जणांना घेवून एस.टीच्या 16 बसेस रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 02:37 PM2020-05-09T14:37:06+5:302020-05-09T14:38:29+5:30

लॉकडाऊनमुळे सांगलीमध्ये अडकलेल्या तामिळनाडुतील 480 जणांना घेवून एस.टी महामंडळाच्या 16 बसेस रवाना झाल्या. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद अवर्णनिय होता.

CoronaVirus Lockdown: 16 ST buses carrying 480 people from Tamil Nadu | CoronaVirus Lockdown :तामिळनाडूतील 480 जणांना घेवून एस.टीच्या 16 बसेस रवाना

CoronaVirus Lockdown :तामिळनाडूतील 480 जणांना घेवून एस.टीच्या 16 बसेस रवाना

Next
ठळक मुद्देतामिळनाडूतील 480 जणांना घेवून एस.टीच्या 16 बसेस रवाना यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ते भारावले

सांगली : लॉकडाऊनमुळे सांगलीमध्ये अडकलेल्या तामिळनाडुतील 480 जणांना घेवून एस.टी महामंडळाच्या 16 बसेस रवाना झाल्या. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद अवर्णनिय होता.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी याच्या प्रयत्नामुळे सदर व्यक्तींना सेलम, तामिळनाडू येथे त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळाली. महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाला धन्यवाद देत त्यांनी गावाकडे परतीचा प्रवास सुरु केला. दूरचा प्रवास असल्याने प्रशासनाने या सर्वाना खाण्यासाठी टिकाऊ अन्नपदार्थ व पाण्याच्या बाटल्या देवून प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

सांगलीमध्ये लॉकडाऊनमुळे तामिळनाडू येथील सुमारे 480 जण अडकली होती. ती एमआयडीसी सांगली/ कुपवाड मध्ये विविध ठिकाणी कामधंदा करत होती. लॉकडाऊन सुरू झाल्या नतंर आपआपल्या गावी जाण्यासाठी ती एकत्र जमली पंरतू त्यांना परत त्यांच्या सांगली येथील निवासच्या ठिकाणी सांगली जिल्हा प्रशासनाने व महानगरपालिका यांनी परत पाठविले.

आज पर्यत प्रशासनाने त्यांचे जेवण खाण्याची सोय केली होती. त्यानतंर जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न केल्यामुळे सदर व्यक्तींना सेलम तामिळनाडू येथे त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळाली .

सर्वाची वैद्यकीय तपासणी करून ते कोव्हिड सदृष्य आजारी नसल्याची तपासणी करून महसूल यंत्रणेने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत एस.टी च्या 16 बसने तामिळनाडू राज्यातील सेलम येथील 480 जणांना रवाना केले.

महाराष्ट्र शासनाचे आणि जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणांचे आभार मानले. जिल्हा प्रशासनाने आमच्यासाठी खूप धावपळ केली. आमच्या घराकडे जाण्यासाठी मदत केली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मिरजेचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार रणजीत देसाई, उपायुक्त स्मृती पाटील, एसटी महामंडळाच्या श्रीमती ताम्हणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेली काळजी त्यांना विशेष भावली. गेली कित्येक दिवस या मजूरांच्या घरवापसीसाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांनाही केलेल्या कामाचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर उमटले.
 

Web Title: CoronaVirus Lockdown: 16 ST buses carrying 480 people from Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.