शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

corona virus : महापालिका कोविड सेंटरमधून १६७ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 15:01 IST

महापालिकेच्या आदिसागर कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोना रुग्णांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ३०८ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, त्यापैकी १६७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या कोविड सेंटरमधील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही फार मोठी दिलासा देणारी बाब आहे.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांचा वाढता ओघ : महापालिका कोविड सेंटरमधून १६७ रुग्ण कोरोनामुक्तआतापर्यंत ३०० जणांवर उपचार, एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

सांगली : महापालिकेच्या आदिसागर कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोना रुग्णांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ३०८ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, त्यापैकी १६७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या कोविड सेंटरमधील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही फार मोठी दिलासा देणारी बाब आहे.महापालिका क्षेत्रात जुलै महिन्यात कोरोनाचा कहर सुरू झाला. तत्पूर्वी जून महिन्याच्या अखेरीपर्यंत केवळ २४ कोरोना रुग्ण होते. जुलैमध्ये मात्र हा आकडा हजाराच्या घरात पोहोचला. दररोज २०० ते ३०० रुग्ण सापडू लागल्याने महापालिकेची यंत्रणाही हादरली होती. रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

आॅक्सिजन बेडचाही तुटवडा जाणवत होता. नगरसेवक अभिजित भोसले यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली. आयुक्तांनी त्याला तात्काळ प्रतिसाद दिला. त्यानंतर जागेचा शोध सुरू झाला. महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आदिसागर मंगल कार्यालयात १२० बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.अवघ्या सात दिवसात महापालिकेच्या यंत्रणेने दिवस-रात्र राबून कोविड हेल्थ सेंटर सुरू केले. या सेंटरमध्ये १०० आॅक्सिजन बेड व २० संशयित रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्यात आल्या. कोविड सेंटर सुरू होताच चार ते पाच दिवसातच ते हाऊसफुल्ल झाले. या सेंटरमध्ये रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.

महापालिकेकडून औषध, जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हे रुग्णालय कोविड रुग्णांसाठी वरदान ठरू लागले आहे. गेल्या पंधरा दिवसात या सेंटरमध्ये ३०८ जण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी १६७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर ६६ जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना इतर रुग्णालयांत स्थलांतरित करण्यात आले आहे.दररोज हजार लिटर आॅक्सिजनचा वापरआदिसागर कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजनचे १०० बेड्स आहेत. या बेड्सना दररोज एक हजार लिटर आॅक्सिजनची गरज भासत आहे. महापालिकेने तीन आॅक्सिजनचे टँक उभारले आहेत. दररोज दीड ते दोन हजार लिटर आॅक्सिजन मागविला जातो. सकाळच्या टप्प्यात आॅक्सिजनची मात्रा कमी लागते. पण रात्रीच्यावेळी आॅक्सिजन जादा द्यावा लागत असल्याचे सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली